नवीन लेखन...
सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे.
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

युगांतर – भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही. माजघरा मागच्या दरवाजातून बाहेर पडल्यावर पडवी वजा जागा होती, लहानपणी येथे सकाळी चुलीवर एक हंडा नेहमी पाणी […]

युगांतर – भाग २

रवींद्र त्या सुर्यनारायणाला नमस्कार करून परत फिरला आणि काही मिनिटातच तो सूर्य अस्ताला गेला आणि सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं. घरात आता ताई, ताईचा नवरा आणि २ काका आणि एक मावसभाऊ एवढे जण होते. घरात आईचा फोटो ठेवला होता आणि त्या समोर दिवा तेवत होता. दुपारी असलेली गर्दी जाउन त्या ठिकाणी आता फक्त उपस्थित लोकांचे श्वास आणि […]

उमलून जाते फुल (सुमंत उवाच – ६२)

आपण काय म्हणून जगतो, काय म्हणून कर्म करतो, आपल्याला नक्की काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे हे सगळं विचार करण्यास भाग पाडत असलं तरी कधी कधी आपली पेक्षा आपल्यामुळे कोणाचे काही बिघडत नाही ना? याचा विचार करणे जास्त महत्वाचे ठरते. […]

युगांतर – भाग १

रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं. […]

वेळेत घ्यावी निवृत्ती (सुमंत उवाच – ६१)

देवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. […]

मन हृदय शरीर एक (सुमंत उवाच – ६०)

कोण कुणा पेक्षा श्रेष्ठ? कोण किती प्रमाणात श्रेष्ठ? कोण कमी पडतंय? कोण कमकुवत आहे? या प्रकारची तुलना जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी जग बघतो तेव्हा होऊ लागते. […]

सोहळे साजरे करुनि घ्यावे (सुमंत उवाच – ५९)

अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे. […]

ज्याच्या आत माझाच चा कहर (सुमंत उवाच – ५८)

हे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी. […]

पर्जन्य काळी व्यवस्थापन (सुमंत उवाच – ५७)

पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो. […]

1 7 8 9 10 11 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..