नवीन लेखन...

बॉलीवूडची मैत्री

मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता. […]

‘उरी-दी सर्जीकल स्ट्राइक’

मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो. […]

टर्मिनेटर २ – जजमेंटल डे

साराह कॉनर आणि भविष्यकाळात परग्रहावरुन येणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मानवी वंशाच्या लढ्याचा नेता म्हणून उदयाला येणार असणारा तिचा जॉन कॉनर हा टिनेजर मुलगा यांची ही कथा. […]

‘सामना’ चित्रपटातील मास्तर

चित्रपटाच्या सुरवातीचा दारुड्या, मध्यंतरी सुधारलेला व हिंदुरावांच्या फॅक्टरीत काम करणारा विश्वासू पण शेवटी सत्याचा छडा लागावा यासाठी उपोषण करणारा एक चळवळ्या माणूस ही जी रेंज डॉ. लागूंनी दाखवलीय, तिला तोडच नाही. […]

‘श्वास-एक ‘दृष्टी’-कोन’

श्वासने काय साध्य केले…तर खूप काही, असंच म्हणाव लागेल.. पन्नासएक लाखाच्या बजेटमधे बनून अडीच कोटीचा व्यवसाय २००४ मधे करणारा… शामची आई नंतर पुन्हा मराठीला सर्वोत्तम चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक व सुवर्णकमळ मिळवून देणारा.. अश्विनलाही उत्कृष्ठ बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देणारा.. आणि मराठी चित्रपट क्लासेस व मासेस दोन्हीला आवडू शकतो हे दाखवून देत मराठी चित्रपटांसाठी व्यवसायीक यशाची मुहुर्तमेढ रोवणारा.. कारण हा होता..मराठी चित्रपटसृष्टीने परशाबरोबर एक मस्त शिळ घालत घेतलेला ‘एक मोकळा श्वास’.. […]

‘लता’

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो.. […]

‘आखरी खत’

एक वर्ष,सव्वा वर्षाचे मूल…मुंबई शहरात एकटं फिरतय..गर्दीतून..गाड्यांच्या मधून..रेल्वे ट्रॕक वरुन…मधेच कुठल्यातरी बाकावर झोपतय…भूक लागते म्हणून एक पडलेली गोळी खातो तर ती झोपेची गोळी असल्याने गाढ झोपी जातय..पुन्हा उठतय…आपल्या आईला शोधत फिरतय… कुणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा अर्धाअधीक भाग असा एखाद्या एक वर्षाच्या मुलावर चित्रीत झालाय हे सांगितले तर पटेल का? माणसाचे आयुष्य अकल्पनीय आहे. ‘Truth is stranger […]

रेडिओचे जादुई दिवस

आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं. […]

कटींग चाय

काय माझे आणि या तंबीचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत कोण जाणे? महिन्याला सहा आकडी पगार कमविणा-या आयटी वाल्या माणसाला हा रोजंदारीवर काम करणारा पोरगा रोज स्वतःच्या हाताने बनवून कटींग चहा पाजतो…तेही फुकट.. मला तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस वाटतो.. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..