श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे.
लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.
आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही. सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि. […]
एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांचीज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपतपडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणाराआपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे, या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे ? पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी ? काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी ? याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो ? कोण आहोत ? याचे जरा सुध्दा भानराहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे. तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हेआपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमानजागृत होत नाही. युवास्सत: साधु युवाध्यापक: । आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥ उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे. युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल. बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते. म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे. परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान ! — सुनिल कनले
आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोत. यंत्राप्रमाणे घाई घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहे. शारीरीक श्रम कमी झाले, जीवन आरामातजगणे सोपे व सुकर झाले, सर्व सोई -सुविधा उपलब्ध झाल्या. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट कायमचीच हरवून गेली, ती म्हणजे मन:शांती होय ! आजआपल्याकडे मन:शांती सोडून सर्व काही आहे. […]
अनादि कालापासून चालत आलेल्या सृष्टिचा गाडा सुरळित चालविण्यासाठी परमेश्वराने नानाविध अवतार धारण करुन जगताला सन्मार्गाला लावण्याचे कार्य केले. धर्माला आलेली ग्लानी दुर करून, सज्जनांचा सांभाळ केला. प्रंसगानूरुप घेतलेल्या अशा अनेक अवतारावरून त्या त्या देवतेची उपासना सुरू झाली. या उपासनेचा क्रम असाच पुढे वाढत जाऊन, त्यातून मग अनंत पंथ, असंख्य संप्रदाय निर्माण झाले. या असंख्य संप्रदायाचे पुढे अगणित पंथ प्रमुख, धर्मगुरू निर्माण झाले. पुढे याच प्रमुखांचे, धर्मगुरूंचे वारस आणि अनुयायी वाढत गेले. […]
भक्तवत्सल भक्ताभिमानी पुर्णब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हातून घडणे ही फार मोठी आणि देवदुर्लभ गोष्ट आहे. ज्या स्वामींच्या दरबारात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवता हात जोडून उभ्या आहेत. लक्ष्मी ही स्वामींचे पाय दाबत आहे. ईंद्र चोपदार झालेला आहे, काळ शरण आलेला असून पडेल ती स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानत असतो. […]
अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात. […]