नवीन लेखन...

मन रामरंगी रंगले

आमच्या गावी गणपतीच्या दिवशी संध्याकाळी गावातले सर्व गावकरी भजनासाठी जमतात. गावकरी येण्याआधी आम्ही सर्व तयारीनिशी सिद्ध राहतो. समोरच्या देवखोलीत सुशोभित आसनावर गणपतीची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली असते. मूर्तीच्या पाठीमागे दिव्यांची आरास झगमगत असते. समोर निरांजनातील दिवे उजळून निघालेले असतात. देवखोली समोरील ओसरीत मनमोहक रांगोळ्यांवर समयी ठेवलेल्या असतात. हातात टाळ, झांजा घेऊन गावकरी येतात. पायपेटी स्थिरस्थावर होते. […]

न्हैचिआड

वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्‍यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली.
[…]

एक सफर ऑस्ट्रेलियाची

अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अगदी महिन्याभरातच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग जुळून आला. एका महासत्तेला भेट दिल्यानंतर या दुसर्‍या प्रगत देशाला जाताना दोघांची तुलना करण्याचे विचार उमटणं साहजिकच होतं.
[…]

गोवा –

गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. […]

९/९ विश्वास निवास

९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..