इंग्रजी वाचनाची पायाभरणी
इंग्रजी वाचनाची ओळख इयत्ता ९ वीत असताना सुरवाणी ज्ञान मंदिरात दामलेसरांमुळे (कै. मुकुंद दामलेसर) झाली. सुरवाणीस मुख्यत: पराष्टेकर सर संस्कृत शिकवायचे आणि मुकुंद दामले सर आठवड्यातून तीन दिवस इंग्रजी शिकवायचे. […]
इंग्रजी वाचनाची ओळख इयत्ता ९ वीत असताना सुरवाणी ज्ञान मंदिरात दामलेसरांमुळे (कै. मुकुंद दामलेसर) झाली. सुरवाणीस मुख्यत: पराष्टेकर सर संस्कृत शिकवायचे आणि मुकुंद दामले सर आठवड्यातून तीन दिवस इंग्रजी शिकवायचे. […]
शालांत परिक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळाल्यावर साहजिकच मानसीने कला विभागाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु विज्ञानाची रंजकता अनुभवल्यामुळे तिने विज्ञान शाखेत केळकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या विज्ञान संशोधकवृतीला खरा फुलोरा आला तो पदवीसाठी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन राम नारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर […]
सौंदर्यशास्त्रात ज्याला कांती म्हणून संबोधिले जाते त्यास शरीर शास्त्रात कातडी अथवा त्वचा म्हंटले जाते. मानवी शरीरातील कातडी हे सर्वात मोठे इंद्रिय आहे. त्वचेत जर दोष अथवा रोग निर्माण होऊन तिचे जर रंग रूप बदले तर त्या व्यक्तीचे जगणे काही वेळा कठीण होऊन जाते. शारिरीक दोषापेक्षा मानसिक आघात त्या व्यक्तीला खच्ची करून जाते . अशा वेळीस त्यास गरज असते ती मानवी संवेदनशीलतेची आणि सर्जनशिलतेची. अशी एक ठाण्यातील वैद्यकीय त्वचा तज्ञ आहे डॉ. पल्लवी उत्तेकर तेलवणे. […]
आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे. […]
निरंजनचा Ph.D. चा संशोधनाचा हा विषय देशातील करोडो मधुमेही रुग्णांना दिलासा देणारा आहे. आज देशातील सात कोटी मधुमेह पिडीत लोकांचे डोळे, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका आहे. या आजारामुळे दरवर्षी असंख्य व्यक्ती बळी पडता आहेत. मधुमेह आजार शोधण्याचे प्रमुख साधन म्हणजे रक्तपेशी मधील ग्लूकोजची तपासणी करणे व ती मर्यादित ठेवणे. नवीन शोधांमुळे डोळ्यातील पाण्यासारखी इतर जैविकद्रव्ये यांची तपासणी करून ग्लूकोजची पातळी ओळखता येते. […]
शालेय वर्षांपासून अभ्यासू म्हणून ओळख असलेल्या प्रियाचा संवेदेनशीलता हा स्थायी स्वभाव. जिज्ञासा संस्था गेली एकवीस वर्षे प्रकशित करत असलेल्या शालेय जिज्ञासा या नियतकालिकाची प्रिया ही प्रथम संपादिका. सरस्वती सेकंडरी स्कूलमधील ही हुषार विद्यार्थ्यांनी १९९५ साली शालांत परीक्षेत मुंबई विभागात गुणवत्ता यादीत आली होती. […]
कुलभूषणचे सध्याचे कार्यक्षेत्र कोळसा, विविध ज्वलनशील वायू आणि इंधन यांचा निर्मिती क्षेत्रात वापर करतानाचे कारखान्याचे नियोजन आणि आराखडा तयार करणे आहे. आगीशी खेळू नकोस हा मराठमोळा सल्ला धुडकावून एक मराठी ठाणेकर तरूण खरोखरच प्रत्यक्ष आगीशी खेळून जागतिक पातळीवर ठाणे शहराचे नाव मोठे करीत आहे ही आपल्या सर्वांनाच अभिमानाची गोष्ट आहे. […]
आज टयूमर नष्ट करण्यासाठी औषधे किंवा ऑपरेशन करावे लागते. हे काम पुढील काळात पेशीतील सूक्ष्म आरएनएच्या सहाय्याने अधिक कार्यक्षमतेने करता येईल. परंतु त्या अगोदर पेशींमधील या संपूर्ण यंत्रणेचा सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. आसावरीसारखे अनेक तरूण शास्त्रज्ञ यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. […]
ऊर्जेचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, कोळसा, जंगल, खनिज तेल आणि वायू यांचा साठा मानवाच्या उथळपट्टीने संपत आलेला आहे. तमाम मानव जातीला अपारंपारिक उर्जा स्त्राsतांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. उर्जा निर्मिती तिपटीने वाढवण्यासाठी अपारंपारिक उर्जेचा वापर प्रामुख्याने असणार आहे. अमृता सारख्या उर्जा क्षेत्रात काम करणाऱया तरूण संशोधकांना हे मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की हे आव्हान आपले तरूण संशोधक नक्कीच स्विकारतील. […]
सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions