सरस्वती सेकंडरी स्कूल – नवकांती पालवली विद्याभवनी !
नूतन विद्या संकुल प्रत्यक्षात साकार करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे मोठे कठीण काम आहे. संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा मेरू पर्वत उचलला जाईल असा संस्थेचा विश्वास आहे. अस्त पावलेल्या जुन्या इमारतीतील विटांनी नवी वास्तु उदयास येणार आहे. या विटांच्या रूपाने, विमलाबाई कर्वे यांनी रुजविलेले आणि जोपासलेले, जुन्या वास्तूतील संस्कार, मूल्य आणि उच्चतम गुणवत्ता हि जीवन सूत्रे नव्या वास्तुच्या गर्भात पुनर्जीवित होणार आहेत. त्यातूनच, मराठी शाळेची कळी नव्याने उमलणार आहे. ‘नवकांती पालवली विद्याभवनी’ असेच वर्णन सरस्वती विद्या संकुलाचे होईल याची मला खात्री आहे. […]