Articles by सुरेश नावडकर
जादूगार रघुवीर
जादूगार रघुवीर यांनी, त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये ७,०२३ जादूचे कार्यक्रम केल्यानंतर १९७७ साली निवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी १९६७ साली, भिकारदास मारुती जवळ ‘जादूची शाळा’ नावाचा, वरती जपानी पॅगोडा असलेला तीन मजली बंगला बांधला. तिथे जादूचे प्रयोग शिकविणारी संस्था सुरु केली. देशातील व परदेशातील कित्येकांनी इथे जादू शिकून घेतली. […]
हयातीचा दाखला
पाच हजारांची फ्रेण्डलिस्ट असणाराही, फेसबुकवर एकटा पडू शकतो.. तो फेसबुकवर कसा व्यक्त होतो, हे महत्त्वाचे असते.. काहीजण सतत टिका करीत असतात.. काहीजण एखाद्या पक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत असतात.. काही उपदेशाचे ‘रेडिमेड’ डोस पाजत असतात.. इथं जर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात, तर अधिक लोकमान्यता मिळते.. […]
बहुत खोया, कुछ न पाया
आज, साठी ओलांडलेल्या पिढीने खूप काही गमावलंय.. आणि जे मिळालंय.. ते तडजोड करुन स्वीकारलंय… काळ बदलला, मात्र मन पुन्हा पुन्हा त्या रम्य भूतकाळातच जातं. […]
एऽ जिंदगीऽ, गले लगाले
बालु महेंद्र यांनी १९७१ साली ‘नेल्लु’ या मल्याळम चित्रपटापासून कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटाला त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! त्यानंतर त्यांनी कन्नड, तेलुगू, मल्याळम, हिंदी अशा विविध भाषांतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण व दिग्दर्शन केले. पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नंदी पुरस्कार व भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळविणारे बालु महेंद्र, हे नामवंत व्यक्ती होते.. […]
‘वारली’चा वाली
भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली… […]
सागरमाथा
एका सामान्य ओझी वहाणाऱ्या हमालाच्या नशिबात, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं भाग्य लिहिणाऱ्या चित्रगुप्ताचं, खरंच कौतुक वाटतं.. आज या गोष्टीला एकोणसत्तर वर्षे झालेली असली तरी शेर्पा तेनझिंगला विसरणं कदापि शक्य नाही… त्यांचा तो हसरा चेहरा प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरलेला आहे.. तो पाचवीत पाहिलेला रंगीत फोटो अजूनही स्मरणात आहे… आजपर्यंत शेकडो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलेला असला तरी, तेनझिंगची सर त्यांना नाही… […]
विंडो सीट
आता प्रवासाचे दिवस संपलेले आहेत.. कधी प्रवास केला तर तो खाजगी गाडीने होतो.. तेव्हाही खिडकीतून बाहेर पहाताना पळणारी झाडं, विजेच्या खांबावरील वरखाली होणाऱ्या तारा, एखाद्या पुलावरुन जाताना दिसणारे नदीचे विशाल पात्र, घाटातून गाडी वळताना आपले शरीर शेजारच्या व्यक्तीवर रेलणे हे अनुभवून जुन्या आठवणींना नकळत उजाळा मिळतो व मी गालातल्या गालात हसतो. […]
‘फेका’डे भाऊजी
‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणजेच ‘मला लोंबकळलेली माणसं’.. अशा स्किममध्ये आपल्याला अडकवणारे, नंबर एकचे ‘फेकाडे’ असतात.. माझा इयत्ता पहिलीतला मित्र, माझ्या पन्नाशीत मला भेटला. त्यानं जनरल चौकशीनंतर, विषयाला हात घातला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत खरं तर तू, तुझ्या कारमधून फिरायला हवा होतास.. अजूनही वेळ गेलेली नाही.. तू माझ्या स्किममध्ये सहभागी हो.. काही महिन्यांतच कारमधून फिरशील..’ मला ओशाळल्यासारखे झाले.. एवढं कळकळीनं सांगतोय, तर प्रयत्न करुन बघू.. म्हणून मी सहभागी झालो.. आठवड्यातून तीन वेळा सेमिनारला जाऊ लागलो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे, लेक्चर देणाऱ्याच्या इशाऱ्यावर टाळ्या वाजवू लागलो.. दरवेळी एखाद्या नवीन मित्राला, ‘बकरा’ करुन घेऊन जाऊ लागलो.. महिन्याभरातच, माझ्याखाली कुणालाही जोडू न शकल्याने स्किममधील पैसे वाया गेले आणि मी नैराश्यात गेलो.. […]