नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

आयुष्याची माती

१९२३ साली गिरगाव चौपाटीवर उभ्या राहिलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्याला, पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.. मुंबईत, या नव्याण्णव वर्षात आमूलाग्र बदल झाला. तरीही बदलला नाही, तो ताठ मानेनं उभा असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा.. शतकानुशतके तो सांगत राहिल… गाथा, एका ‘आयुष्याच्या मातीची’…. […]

अंबाक्का

या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली.. […]

गजरेवाला

पूर्वी ‘ती फुलराणी’ सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे.. […]

कात्रीची करामत

वामन भोसले यांनी उत्कृष्ट संकलन केलेल्या.. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, आँधी, कर्ज, कालिचरण, साहेब, रामलखन, खलनायक, इत्यादी सुपरहिट चित्रपटांना चित्ररसिक कधीही विसरू शकणार नाहीत… […]

दे धमाल ‘पुरूषोत्तम’

पुरुषोत्तम बेर्डे यांनी आजपर्यंत दहा नाटकांचे लेखन, वीस नाटकांचे दिग्दर्शन, साठ नाटकांना संगीत, पाच नाटकांची व नऊ चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. […]

महारथी तोरणे

१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘गरीबाघरची लेक’ या चित्रपटापासून कमलाकर तोरणे यांची कारकिर्द सुरु झाली. त्यांचं वाचन दांडगं होतं. पन्नासच्या दशकातील ‘वुई आर नो एंजल्स’ या गाजलेल्या इंग्रजी चित्रपटावरुन मराठी चित्रपट करण्याचे त्यांनी ठरविले. १९६८ साली त्यांचं ते स्वप्नं ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ द्वारे प्रत्यक्षात उतरलं.. […]

पण ‘लक्षात’ कोण घेतो?

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून आलेली एक तरुणी आपल्या मित्राबरोबर गेल्या रविवारी शनिवार वाडा पहाण्यास पुण्यात आली. शनिवार वाडा पाहून झाल्यावर कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मित्राबरोबर रस्ता ओलांडताना, भरधाव आलेल्या बुलेटस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, त्याने दोघांनाही जोरदार धडक दिली.. परिणामी मित्र एका बाजूला व ती तरुणी दुसऱ्या बाजूला पडली.. मागून येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली ती आल्याने […]

वपु नव्हे .. अत्तराची कुपी!

खरं तर त्यांच्या प्रत्येक कथेवर चित्रपट निर्मिती होऊ शकते.. मात्र तसं काही फारसं प्रत्यक्षात घडलं नाही. त्यांच्या साहित्यावर इनमीन, तीनच मराठी चित्रपटांची निर्मिती झाली.. १९७० साली वपुंच्या कथेवर ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट, २०१२ साली त्यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवर आधारित ‘पार्टनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१५ साली वपुंच्या ‘बदली’ या कथेवरुन ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती झाली होती.. […]

मोना डार्लिंग

बिंदूने १९८५ सालापर्यंत अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यातील ‘इम्तिहान’, ‘हवस’, ‘कामशास्त्र’ चित्रपटातील भूमिका व्हॅम्पीश होत्या. ‘अभिमान’, ‘अमरप्रेम’ सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका, दुसऱ्या टोकाच्या होत्या. ‘हम आपके है कौन’ सारख्या चित्रपटांतून तिने मावशी, आत्याच्या भूमिका केल्या. आजवर २०० हून अधिक चित्रपटात कामे करुन तिने आता चित्रसंन्यास घेतलेला आहे. तिच्या भूमिकांचं कौतुकही झालं, मात्र सात वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळूनही, तो पुरस्कार काही तिला मिळाला नाही.. […]

मित्र असावा, तर असा

सरांना पुण्यात कोथरुड येथे येऊन चार वर्षे झालेली आहेत. सरांच्या रोजच्या पोस्ट वाचणारे वाचक असंख्य आहेत, मात्र ती वाचून व्यक्त होणारे, बोटांवर मोजण्याइतकेच.. ही खंत कुलकर्णी सरांनी अनेकदा फेसबुकवर व्यक्त केली.. आता मी लेखन बंद करणार असेही जाहीर केले.. अशावेळी अनेकांनी पोस्ट लिहिणं बंद करु नका, अशी विनवणी केली.. सरांनी पोस्ट लिहिणं चालू ठेवलं… […]

1 9 10 11 12 13 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..