नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

‘तुझसा’ नहीं देखा

‘चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. फक्त राजेंद्र कुमार!! […]

तदेव लग्नं, सुदिनं तदेव

सकाळी कामावर जाणाऱ्या पतीला खिडकीतून हात हलवून निरोप देणारी पत्नी, शाळेत मुलाला घेऊन जाणारी आई, संध्याकाळी पती कामावरुन आल्यावर त्याला चहाचा कप हातात देणारी पत्नी, रविवारी सकाळी सर्वांसाठी कांदेपोहे करणारी गृहिणी.. आता विस्मरणात जाऊ लागली आहे.. […]

फ्युज उडालेले बल्ब

शहरातील पाॅश एरियातील हाउसिंग सोसायटीमध्ये, रहायला येऊन मला पाच वर्षे झाली होती. मी भारतीय नौदलात पस्तीस वर्षे सेवा करुन निवृत्त झालो होतो. रोज सायंकाळी आम्ही आठ दहाजणं ज्येष्ठ नागरिक, सोसायटीच्या बागेत गप्पा मारत बसायचो. त्यामुळे वेळ मजेत जात असे. गेल्या महिन्यापासून आमच्याच वयाची एक नवीन व्यक्ती आम्हाला बागेत दिसू लागली होती. ते गृहस्थ उंचेपुरे व धिप्पाड […]

क्लॅपरबाॅय

१९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी […]

एक छान मैत्रीण हवी

प्रत्येकाला जीवनात, ‘मैत्रीण’ लाभतेच असं नाही.. पूर्वी एकाच वाड्यात, चाळीत अनेक कुटुंबं रहायची.. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणी भरपूर असत, त्यांच्या मैत्रीसंबंधावर पालकांचाही विश्र्वास असायचा.. त्यातूनही शाळा, जर मुला-मुलींची एकत्र असेल तर वर्गातील मैत्रीण घरी आल्यावर तिलाही पालक कुटुंबात सामावून घेत असत. काॅलेजमधील मैत्रिणी हा वर्गात व घरात, चर्चेचा विषय असे. ती जर सहज घरी आली तर तिला […]

सिनेमाची बखर

इसाक यांनी ‘जी’ व ‘माधुरी’ या पाक्षिकांसाठी लेखन सुरु ठेवले. पन्नास वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दी दरम्यान, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. भगवान यांच्यावरचं ‘अलबेला’, ‘आई, माॅं, मदर’, दादा कोंडके यांच्यावरचं ‘एका सोंगाड्याची बतावणी’, ‘गुरुदत्त-एक अशांत कलावंत’, ‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ’, ‘चित्रपट सृष्टीतील काही एकतर्फी प्रेमकहाण्या’, सुलोचना दीदींवरील ‘चित्रमाऊली’, ‘तीन पिढ्यांचा आवाज-लता’, ‘पेज थ्री’, नूरजहाँ ते लता’, ‘दादासाहेब फाळके’, ‘मराठी चित्रपटांचा इतिहास’, ‘मराठी चित्रपटांचा १०० वर्षांचा आढावा’, ‘मीनाकुमारी’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.. […]

ललिऽताऽऽ

तीस वर्षांत तिने सात भाषेतील एकूण ३०० चित्रपट केले. यामध्ये तिचे सर्वाधिक चित्रपट हे जितेंद्र सोबत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन व श्रीदेवीचे. राजेश खन्ना सोबतही तिने काही चित्रपटांतून दर्शन दिले. […]

मोबाईलचा पहिला काॅल

दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा! त्या पहिल्या मोबाईलचे नाव होतं ‘डायनाटेक’. एक किलोहून त्याचं वजन जरा जास्तच होतं. त्याची लांबी १३ सें.मी. व रुंदी ५ सें.मी. होती. तो चार्ज होण्यासाठी तब्बल दहा तास लागायचे. पूर्ण चार्ज झाल्यावर तो फक्त अर्धा तास वापरता यायचा. […]

आम्ही जातो ‘अमुच्या’ गावा

श्रीकांत मोघे यांचा १९६१ साली प्रदर्शित झालेला ‘प्रपंच’ हा चित्रपट मी गणपतीच्या दिवसांत खजिना विहीर चौकात पाहिलेला आहे. मधुकर पाठक यांचं दिग्दर्शन, गदिमांनी लिहिलेली गीतं, सुधीर फडके यांचं अप्रतिम संगीत असलेला चित्रपट मी कधीही विसरू शकत नाही. […]

‘राजा’ चित्रपंढरीचा

१९५२ सालातील ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. एकूण २५ वर्षांच्या कालावधीत २५ चित्रपट केले. त्यातील २२ मराठी, २ हिंदी व १ इंग्रजी. मराठी चित्रपटांसाठी मराठी साहित्यातील नामवंत लेखकांच्या कथांना प्राधान्य दिलं. […]

1 10 11 12 13 14 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..