मी आणि ‘वपु’
एकूण चार कथा त्यांनी सांगितल्या, ज्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. तो ‘श्रवणानंद’ मी कधीही विसरू शकत नाही. त्याकाळी वपुंच्या कथाकथनाच्या कॅसेट भरुन मिळत असतं. मी देखील सोनीची कोरी कॅसेट देऊन भरुन घेतली होती. […]
एकूण चार कथा त्यांनी सांगितल्या, ज्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. तो ‘श्रवणानंद’ मी कधीही विसरू शकत नाही. त्याकाळी वपुंच्या कथाकथनाच्या कॅसेट भरुन मिळत असतं. मी देखील सोनीची कोरी कॅसेट देऊन भरुन घेतली होती. […]
तिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या. […]
चित्रपटांपेक्षा त्यांना नाटकांमध्ये काम करणे अधिक पसंत असायचे. गडकरींच्या नाटकांतील विनोदी पात्रं ते लीलया साकारायचे. ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकातील ‘नाना बेरके’ ही व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अजरामर करुन ठेवलेली आहे. […]
वयाच्या साठीनंतर उपभोगलं जाणारं प्रत्येकाचं जीवन, हे ‘बोनस’ लाईफच असतं. बालपण वय वर्षे चौदापर्यंत, भुर्र उडून जातं. गद्धेपंचविशीपर्यंत, शिक्षण पूर्ण झालेलं असतं. नोकरी आणि छोकरी तिशीपर्यंत, जीवनात समाविष्ट होते. पुढील तीस वर्षे पाठीचा कणा तुटेपर्यंत, संसाराचा गाडा हाकावा लागतो. साठीपर्यंत घरातील जबाबदाऱ्या पार पाडून, तृप्त भावनेने, कर्ता करविताचे अस्तित्व अनेक युद्ध गाजवून छातीवर दहावीस मेडल्स मिरविणाऱ्या, […]
दूरदर्शन सुरु झाल्यावर आम्ही ‘अपट्राॅन’ कंपनीचा कृष्णधवल पोर्टेबल टीव्ही घरी आणला होता. त्याकाळी संध्याकाळच्या बातम्या आवर्जून बघितल्या जात असत. तेव्हा वासंती वर्तक हमखास दिसायच्या.. टिपिकल साडी आणि नाममात्र मेकअपमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. त्याआधी मित्रांच्या घरी जाऊन टीव्ही बघताना, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर यांना बातम्या देताना अनेकदा पाहिलेलं होतं. […]
आम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला तेव्हा जॅकी श्राॅफची समक्ष भेट झाली. ‘पैंजण’ या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट जाहिरातीबद्दल तो पहिला पुरस्कार होता. रंगभवनला पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यावर ‘हाॅटेल ताज’ला पार्टी असल्याचं समजलं. आम्ही दोघं बाळासाहेब सरपोतदार यांचे सोबत गेलो. ‘ताज’मधील एका प्रशस्त हाॅलमध्ये पुरस्कार विजेते, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व काही सेलेब्रिटी सहभागी झाले होते. आयुष्यात पहिल्यांदाच […]
१९५१ साली सुरु झालेली रमेश देव यांच्या चित्रपटांची कारकिर्द, साठ वर्षांहून अधिक काळ चालू राहिली. मराठी सोबत हिंदी चित्रपटांतून विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. मद्रासच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी खलनायकही रंगविले. ‘आनंद’ चित्रपटातील डाॅ. कुलकर्णी हे रमेश देव व सीमा देव, दांपत्य कोण विसरेल? […]
यमराज आजच्या ‘डिस्पॅच’ यादीवर नजर टाकत होते. त्यांनी नाव वाचलं ‘शुभांगी’, वय पन्नास, घरात सासू-सासरे, नवरा व मुलगा. मृत्यूचं निमित्त. हार्ट ॲटॅक. वेळ. मध्यरात्र. शुभांगी दिवसभर घरकाम करुन थकलेली होती. तिचे पती शेखर, नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. वयोवृद्ध सासू सासरे, हे तिचे आधारस्तंभ होते. मुलाचं काॅलेज शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला […]
मिलिंद राधिकाला घेऊन, डाॅ. परांजपे यांच्या मॅटर्निटी होममध्ये आला होता. गेल्याच वर्षी त्याचं राधिकाशी, शुभमंगल झालं होतं. वर्षभरातच ‘बाप’ होणार असल्याची गोड बातमी, राधिकाने त्याच्या कानात हळूच सांगितली होती. रिसेप्शनिस्टनं राधिकाचं नाव पुकारल्यावर, दोघेही डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डाॅक्टरांनी राधिकाची तपासणी करुन काही गोळ्या व टाॅनिक्सची नावं त्यांच्या असिस्टंटला लिहून द्यायला सांगितली. त्या लेडी असिस्टंटकडे पाहून, मिलिंदला […]
आज दादांचा २४वा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने आज तीन स्त्रियांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातील पहिली आहे, सौ. सुप्रिया शेखर शिंदे! हिने शिल्पकलेत प्रावीण्य मिळवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्प घडवण्यात भारतातील पहिल्या स्त्री शिल्पकाराचा मान मिळवला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions