नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

हसताना पडते तिला गोड खळी

१९९० च्या जून महिन्यातील मुंबईची सकाळ.. आमचं ‘सूडचक्र’ चित्रपटाचं सर्व युनिट ‘किरण’ बंगल्यावर पोहोचलं. दहा वाजता मुहूर्ताचा नारळ वाढवून, शुटींगला प्रारंभ झाला.. लेडी इन्स्पेक्टरच्या गेटअपमध्ये ती कॅमेऱ्यासमोर आली आणि मी पहातच राहिलो.. ती होती चित्रपटाची डॅशिंग नायिका, वर्षा उसगांवकर!! तिला पहिल्यांदा पुण्यात मी पाहिलं होतं, ‘तुझ्या वाचून करमेना’च्या सेटवर.. त्यावेळचं चित्रपटसृष्टीतील तिचं, ते पदार्पण होतं.. ‘सुयोग’च्या […]

फिर वही ‘जाॅय’ लाया हूॅं

‘फिर वही दिल लाया हूॅं’ चित्रपटात, आशा पारेख होती. खांद्यावर गिटार घेऊन, लाल टी शर्ट व पांढऱ्या पॅन्टमधील बागेतून गात चालणारा जाॅय, तरुणींच्या दिलाची ‘धडकन’ झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत. कितीही वेळा ती ऐकली किंवा पाहिली तरी ‘दिला’चं समाधान काही होत नाही. […]

तेथे कर माझे

माणसाच्या जीवनात स्त्रीचा सहवास सुरु होतो, तो आईपासून. त्यानंतर मावशी, आत्या, काकू, आजी, पणजी, भाची, पुतणी, मुलगी, सून, नात या नात्यांची भर पडत जाते. जीवनातील प्रत्येक वळणावर स्त्री कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून त्याला आयुष्यभर भेटतच रहाते. काहीजणी, काही क्षणांसाठी भेटतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात. मात्र प्रत्येकीची नोंद ही त्यांच्या मनाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये झालेली असते. जी […]

ज्येष्ठ चित्रकार गोपाळ देऊसकर

गोपाळ देऊसकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरासाठी, बालगंधर्वांची दोन रूपातील केलेली पूर्णाकृती चित्रे सुप्रसिद्ध आहेत. ही चित्रे करण्यासाठी माॅडेल म्हणून ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते, विवेक यांची निवड केली होती. स्त्री रुपातील रुक्मिणीचा हात चितारताना मऊसुत, गुलाबी रंगाचा पंजा असणारी स्त्री, गोपाळ देऊसकरांना हवी होती. हृदयनाथ मंगेशकरच्या लग्न समारंभात, कॅमल कंपनीच्या मालकांची पत्नी, रजनी दांडेकर हिचा हात पाहिल्यावर गोपाळ देऊसकरांना चित्रासाठी तो योग्य वाटला. ही रजनी, पूर्वाश्रमीची संगीत रंगभूमीचे गायक नट, अनंत वर्तक यांची कन्या होती. तिचा हात पाहून त्यांनी तो हुबेहूब चितारला व चित्राला जिवंतपणा आला. […]

सावंत ‘विकी’

विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’! […]

सप्तसुरांची भैरवी

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाला, घटनेला जुळणारी गाणी लतादीदींनी गायलेली आहेत. ती ऐकली की, आपण त्या काळात जाऊन येतो. म्हणूनच त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता शतकानुशतके अबाधित राहील. […]

रोझी आणि चमको

चंदेरी दुनियेत कारकिर्द करताना, अनेकजण संपर्कात येतात. मग ते नायक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणीही असू शकतं. त्यांच्याशी पाऱ्यासारखं अलिप्त रहाणं ज्याला जमलं, तोच खरा! अन्यथा जीवनात नैराश्य येतं. दोघींच्याही जीवनात तशा गोष्टी घडलेल्या आहेत. वहिदानं त्या गोष्टींवर पडदा टाकलाय. दिप्ती विसरण्याचा प्रयत्न करतेय. […]

जसबीरची फरफट

अमिताभ बच्चन बरोबर ‘डाॅन’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘पुकार’, ‘महान’, ‘दोस्ताना’, ‘लावारिस’ चित्रपटात तिची केमेस्ट्री छान जुळली. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील तिच्यावरील चित्रीत ‘आप जैसा कोई, मेरे जिंदगी में आए..तो बात बन जाए..’ या नाझिया हसनच्या गाण्यामुळे ती चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरली. […]

मिडास टच

‘तिसरी मंझील’चा नायक खरंतर देव आनंद होता, काही कारणाने तिथं शम्मी कपूर नक्की झाला. आशा पारेख नायिका, प्रेमनाथ खलनायक. आरडीची झिंग आणणारी, एकसे बढकर एक अशी हिट गाणी! यातील थरारक रहस्याची गुंतागुंत विजय आनंदने उत्कृष्टरित्या सादर केली. प्रत्येक गाण्याचं टेकींग हे अफलातून केलं. […]

ऐसी दिवानगी

५ एप्रिल १९९३ रोजी पाचव्या मजल्यावरील, बाल्कनीच्या खिडकीतून पडून दिव्या, दूरच्या प्रवासाला निघून गेली. हे तिचं अचानक मृत्यूमुखी पडणं एक न उलगडलेलं, गूढ रहस्यच होऊन राहिलं. […]

1 12 13 14 15 16 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..