नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

एक था गुल और एक थी

राजेश खन्नाच्या ‘रोटी’ने सर्वत्र रौप्यमहोत्सव साजरे केले. त्याच दरम्यान त्याला एक सहा फुटी लंबू भेटला व ‘परवरिश’ चित्रपटाची निर्मिती झाली या लंबूशी त्याची ‘केमिस्ट्री’ जुळली व पुढील त्याचे सलग आठ चित्रपट, सुपरहिट झाले. तो निर्माता-दिग्दर्शक म्हणजेच, ‘लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड’ स्टोरीचा हुकमी किमयागार मनमोहन देसाई!! […]

मी मराठी माझीही मराठीच

२७ फेब्रुवारीला दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या ‘पोस्ट’ एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं ‘मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं’ काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. तरच ही ‘अमृताहून गोड’ भाषा टिकून राहील. सकाळी उठलं की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती l करमुले […]

कुछ तो गडबड है

एका सकाळी महेशचा फोन आला व त्यानं डेक्कनवरील हाॅटेल ‘परिचय’मध्ये आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दहा वाजता रुमवर पोहोचलो. महेश भेटला. चर्चा झाली. एवढ्यात त्या रुममध्ये एका धिप्पाड व्यक्तीने प्रवेश केला. आम्ही त्यांच्याकडे पहातच राहिलो. महेशने आमची त्यांच्याशी ओळख करुन दिली, ‘शिवाजी, हे नावडकर बंधू. आपल्या चित्रपटाची पब्लिसिटीचं काम करताहेत.’ […]

सुरा मी वंदिले

सदाशिव पेठेत असताना घरात रेडिओ नव्हता. समोरच्या जबरेश्वर हाॅटेलमध्ये बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम मोठ्या आवाजात लावला जात असे. तेव्हा अमीन सयानीच्या टिपीकल बोलीतून दहापासून पहिल्या ‘पायदान’पर्यंत एकेक गाणी ऐकलेला आशाताईंचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे. […]

‘पाऊल’ आणि ‘पाय’

जेव्हा मराठीच्या अस्मितेबद्दल सांगायचे असते तेव्हा ‘मराठी पाऊल, पडते पुढे’ असे अभिमानाने आपण म्हणतो. दरवर्षी वारकरी आषाढीला पंढरपूरला पायी वारी करतात, तेव्हा त्यांच्या तनामनात एकच ध्यास असतो तो म्हणजे ‘पाऊले चालती, पंढरीची वाट..’ ती ‘पाऊलेच’ त्यांना विठ्ठलाच्या पायापर्यंत घेऊन जातात. […]

‘किसन’ नावाचं अजब ‘रसायन’

किसनरावांच्या प्रत्येक भेटीत त्यांना असलेली सांस्कृतिक विषयांची आवड दिसून येत होती. साहित्य, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, इत्यादी विषयांवर आमच्या गप्पा होत असत. भेटी होत होत्या. दरम्यान अप्पा बळवंत चौकात माईंनी ‘संस्कृती प्रकाशन’ची मुहूर्तमेढ रोवली. […]

लेखणीतला, रूपया बंदा

पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत. राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो. १९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला! […]

‘रईस’ भात

स्वयंपाक करणारी स्त्री ही जर का सुगरण असेल तर ती भाताचे विविध प्रकार करुन वाढते. मग तो नारळी पौर्णिमेला केलेला नारळीभात असेल, कधी सणासुदीच्या निमित्ताने केलेला मसाले भात असेल, कधी टोमॅटो भात, कधी विविध भाज्या वापरुन केलेला व्हेज पुलाव असेल, मटारच्या सीझनमध्ये मटार पुलाव असेल तर कधी जिरा राईस! […]

विच्छा’ आमची अपुरीच राहिली

९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले. […]

जसच्या तसं

आमच्या पिढीने हे सर्व थिएटरमधील भव्य पडद्यावर पाहिलंय. त्यामुळे आम्ही चित्रपट संपल्यानंतर बाहेर पडताना आमच्या डोक्यात हिरोच असायचा. त्याचं चालणं, बोलणं नकळत आमच्यामध्ये भिनलेलं असायचं. आता पडद्याचा जमाना गेला. आता चाळीस इंची टीव्हीवर तुम्ही जे पाहता त्याची नक्कल व अनुकरण केले जाते. […]

1 13 14 15 16 17 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..