नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

वाचनातूनच ‘खरं’ जग कळतं

हरलेल्या व्यक्तीला प्रोत्साहन दिलं तर तो जिंकू शकतो. हे समजायला वाचनच मदतीला येतं. अपयशी ठरल्या नंतर आत्महत्येचा विचारही मनात न येता उमेदीनं जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. एकमेकांच्या सुख दुःखाची तीव्रता कळू लागते. करोडपती असणाऱ्या माणसातील ‘गरीबी’ व हमाली करुन जेमतेम भूक भागविणाऱ्यातील ‘श्रीमंती’ दिसू लागते. […]

आलेपाक

साखर आणि आल्याच्या रसापासून केलेले ही वडी बहुगुणी औषधी आहे. पाचक व पित्तनाशक आहे. सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. इतकं स्वस्त औषध उपलब्ध असताना आपण सर्रास महागडी आकर्षक पॅकींगमधली सीरप खरेदी करतो. […]

संपर्क आणि सहवास

आपण आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात आहोत, मात्र सहवासात नाही.कधी मनसोक्त बोलणं नाही, चर्चा नाही. आपण सारेच ‘स्वमग्न’ झालो आहोत. फक्त स्वतःचाच विचार! […]

कोरोना’ माय’ हाय हाय

घराशी गाडी पोहचल्यावर पोलीस पार्वतीला घेऊन उतरले आणि पाहतात तो काय? सुधीरच्या घराला कुलूप होते! पोलीस चक्रावून गेले. त्यांनी फोन लावला. सुधीरने उत्तर दिले, ‘मी पत्नीसह बाहेरगावी आलोय. मी काही आता माझ्या आईला घरात घेणार नाही. तुम्ही तिला कुठेही ठेवा. मला कोरोना झालेली आई घरात नको आहे.’ पोलीस हतबल झाले. […]

बकासूरी कोरोना

गेले वर्षभर कोरोनाला सहन केलं, नंतर त्याचा प्रभाव कमी झाला. जरा कुठे परिस्थितीत सुधारणा होते आहे असं वाटेपर्यंत पुन्हा त्याने डोकं वर काढलं. सर्व सामान्य जनतेला लाॅकडाऊनच्या ‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेला सामोरे जावे लागले. […]

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ!

नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. येणाऱ्या अडचणींवर कोणता उपाय करायचा हा सल्ला देखील तो आपलेपणाने मालकाला वेळोवेळी देत असतो. […]

वर्षभराचा सारीपाट

खरं तर तो कुटुंबाचा वर्षांभराचा सारीपाटच असतो. प्रत्येकाला त्याच्या खेळीप्रमाणं दान पडत असतं. उद्या काय घडणार आहे हे माहीत नसताना, दिवस उजाडतो.. मावळतो.. प्रत्येक दिवस काही ना काही जीवनात भर तरी टाकतो किंवा एखादी गोष्ट हिरावून घेतो. सगळं कसं मृगजळासारखं असतं. […]

खलनायक? नव्हे ‘नायक’!

शाही सोहळ्यासाठी मिलिंद गुणाजीने चाळीस लाख रुपये खर्च करुन, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडी मंडळी व खास पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला.. […]

‘आवाजा’चा जादूगार

चित्रपटाचे संगीतकार नौशाद हे ट्रायल पाहून, तणतणत मंगेश देसाईकडे आले व ‘साले, साऊंड मिक्सींग करनेवाले, मेरे गाने का सत्यानास किया तुने xxxx’ असे आवाज चढवून भांडू लागले. मंगेशने देखील त्यांना वरच्या पट्टीतच उत्तर दिले, ‘थिएटर में देखना और बुरा लगे तो इधर वापस मत आना xxxx’ ‘पाकिझा’ चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ पाहून नौशाद, मंगेश देसाईला भेटायला आले व अक्षरशः त्याला लोटांगण घातले. […]

1 14 15 16 17 18 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..