माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.
आम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार. […]
‘ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे. […]
माणसांच्या जीवनातील एक अविभाज्य ‘पेय’ म्हणजे चहा.. जो त्याला अगदी लहानपणापासून ते उतारवयापर्यंत, तिन्ही त्रिकाळ साथ देतो.. बाळाला कळायला लागलं की, आई कौतुकानं त्याला आपल्या कपातील चहा, बशीत ओतून देते.. ते शाळेत जायला लागलं की, सकाळी चहाबरोबर बिस्कीट हे ठरलेलंच असतं.. कुणा पाहुण्यांकडं गेलं की, आमचा बंड्या चहा पीत नाही हे अभिमानाने सांगितलं जातं.. फारच आग्रह […]
वसंतराव आणि वसुधा हे सत्तरी ओलांडलेलं जोडपं.. वसंतरावांनी चाळीस वर्षे सरकारी नोकरी केली. वसुधानं ‘घर एके घर’ सांभाळलं.. वसंतराव खेड्यातून शहरात आले, शिकले व नोकरीला लागले. नोकरी लागल्यावर घरच्यांनी नात्यातील एका मुलीशी, वसंतरावांचे लग्न लावून दिले. वसुधाचं शिक्षण कमी असल्याने त्यांनी गृहिणीपद व्यवस्थित सांभाळले. उपवास, व्रतवैकल्ये करुनही त्यांना मूलबाळ काही झाले नाही. जुन्या चाळीतच अनेक वर्षे […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनमोल कामगिरी करणाऱ्या, आपल्या सहकाऱ्यांना कधी सोन्याचं कडं तर कधी नजराणा, जहागीर दिली होती.. त्यांच्या पश्चात तीनशे वर्षांनंतरही अभयसिंहराजे छत्रपतींची परंपरा चालवत होते. […]
स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला.. आज स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षं झाल्यानंतरही गेली चोवीस वर्षे अगदी एक वर्षाच्या बाळापासून नव्वदीतल्या ज्येष्ठांपर्यंत आपण सर्वजण मोबाईल उर्फ सेलफोनच्या जेलमध्ये, स्वखुशीने बंदीवान […]
हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲन्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स […]
काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे. […]
मी दहावीत असताना वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती मध्ये एक जाहिरात वाचली होती. मनीऑर्डरने दहा रुपये व जन्म तारीख, वेळ व ठिकाण पाठविल्यास आम्ही तुमचे भविष्य पोस्टाने पाठवू. […]