नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

छोटी अशी बाहुली, मोठी तिची सावली

नृत्यदिग्दर्शिका म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक म्हणजे आठ वेळा फिल्मफेअर ॲ‍वाॅर्ड मिळविणारी ही एकमेव ‘डान्समास्टर’ होती. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी व नंदी ॲ‍वाॅर्ड विजेती सरोजने सुमारे दोन हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. […]

पिठाची गिरणी

आता जमाना बदलला आहे. पिठाच्या गिरण्यांची संख्या कमी झाली आहे. तयार आट्याची दहा किलोची आकर्षक ब्रॅण्डेड पॅकेट्स मिळतात. उच्च मध्यम वर्गीयांकडे पोर्टेबल आटा चक्की असते. ते घरच्याघरी गहू, ज्वारी दळू शकतात. […]

उसवलेले जोडे

हिंदी कलाकारांची उदाहरणं देण्याचा उद्देश असा की, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं.. यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, मालमत्ता सर्व काही आहे. यांना कशाची कमतरता? प्रत्यक्षात तसं नसतं. ही माणसं त्यांच्या खऱ्या जीवनात दुःखी, कष्टीच असतात. जणूकाही ‘उसवलेले जोडे’…. […]

निर्मळ आरसा

आपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!! […]

‘माणसं’ ब्लाॅक होतात, ‘मन’ नाही

काॅलेजमध्ये असताना एक सिनियर मित्र होता. काॅलेजमधील सांस्कृतिक कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. तो बोलघेवडा असल्याने त्याच्या सर्व प्राध्यापकांशी ओळखी होत्या. त्याचा गैरवापर करून तो माझ्यावर दबाव आणू लागला. […]

इस दुनिया में जीना है तो

‘शोले’ चित्रपटानं इतिहास रचला.. त्यातील ‘मेहबुबा, मेहबुबाऽ..’ हे नृत्यगीत खास आकर्षण होतं.. ‘इन्कार’ चित्रपटातील ‘तु मुंगळाऽ..’ या देशी बारमधील गाण्याने सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत कहर केला… […]

‘सातवं’ घर

कंटाळून महेशचे आई वडील मोठ्या मुलीसाठी अमेरिकेला गेले. सहा महिन्यांनी परत आल्यावर महेशसाठी नांदेडसिटीत पाॅश फ्लॅट घेतला. त्याच्यासाठी पुण्यात राहिले. तो बंगलोरला गेल्यावर गांवी गेले. आता शेतीचे काम बघताहेत. आमची भेट झाल्यावर दोघंही आपली खंत बोलून दाखवतात. […]

बिनचेहऱ्याची माणसं

कंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस‌ रुपये मागितले. […]

‘बाल’श्रीमंत’!!

खरंच, लहानपण आनंदाचं असतं.. कशाचीही काळजी नसते.. काळजी घेणारे कायमच जवळपास असतात.. आपल्या आवडी निवडी जपल्या जातात.. […]

नाट्यपंढरीचा वारकरी

महाराष्ट्र विद्यालयातील आठवीचा वर्ग. मराठीच्या शं. रा. देवळे सरांचा तास होता. आदल्या दिवशीच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितला होता. विषय दिला होता, ‘तुमचा आवडता लेखक.’ सर वर्गात येऊन बसले. वर्गावर एक नजर फिरवली व म्हणाले, ‘प्रत्येकाने पुढे येऊन आपला निबंध वर्गाला वाचून दाखवा’. एकेकजण पुढे येऊन वेगवेगळ्या लेखकांवर लिहिलेले निबंध वाचून जात होता. एकाचाही […]

1 21 22 23 24 25 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..