नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

डालडा

भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या सालातील गोष्ट आहे.. सहावीत इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीला वर्गातील खोडकर मुलं ‘डालडा’ म्हणून चिडवत होती. दहाच वर्षांनंतर ती मुलगी ‘डालडा’ नव्हे तर अस्सल ‘देसी घी’ च्या रूपांत चंदेरी दुनियेत झळकली… माला सिन्हाचा जन्म १९३६ सालातील ११ नोव्हेंबरचा. तिची आई नेपाळी व वडील बंगाली. तिचं बालपण कलकत्यातच गेलं. तिचा आवाज गोड असल्याने […]

पाॅंचवाॅं मौसम.. (काल्पनिक कथा)

रविवारचा दिवस. संध्याकाळची वेळ. मुकुंदराव आज खूपच दिवसांनी फिरायला बाहेर पडले होते. वृद्धाश्रमाच्या नियमानुसार आठवड्यातून एकदाच, फक्त रविवारी त्यांना बाहेर पडता येत होतं. झब्बा, पायजमा आणि खांद्यावरील शबनम बॅग अशा नेहमीच्या पेहरावात ते बराच वेळ बागेत बसले होते.. घड्याळात सात वाजलेले पाहून ते गडबडीने उठले व चालू लागले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आठ वाजेपर्यंत शिंदे मॅडमच्या वृद्धाश्रमात […]

हरवलेला मधुचंद्र

मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला.. मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा […]

कोलंबस (काल्पनिक कथा)

गेल्याच आठवड्यात माझा एकसष्ठीचा समारंभ पार पडला. नातेवाईक आणि बरीच मित्रमंडळीं त्या निमित्ताने एकत्र आलेली होती. निमंत्रणामध्ये भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, असं लिहूनही अनेकांनी बुके व प्रेझेंट्स आणलेली होती. प्रत्येकाला मी व्यक्तीशः भेटत होतोच, तरीदेखील काहीजण न भेटताही येऊन गेल्याची शक्यता होती.. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.. दोन दिवसांनंतर त्या दिवशी आलेल्या प्रेझेंटच्या बाॅक्सेसवरची नावं मी वाचत […]

बच्चू.. (काल्पनिक कथा)

रविवारची दुपार होती. मी मस्त जेवण करुन गॅलरीतील माझ्या आरामखुर्चीत विसावलो होतो. निवृत्तीनंतरचा काळ हा पुण्यातच घालवायचा हे माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं. त्या स्वप्नपूर्तीचं सुख मी निवांतपणे उपभोगत होतो.. सहजच मोबाईलवर फेसबुक चाळताना, मेसेंजरवर एक मेसेज आला. मी मेसेंजर ओपन करुन पाहिलं, तर ‘रेवती जोशी’ असं नाव दिसलं. तिनं मला ‘Hi’ केलेलं होतं.. रेवती, हे […]

जोशीबुवा मासिकवाले

२००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला. […]

अडगळीतली काठी

पल्लवी ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी. तिला अतिशय लाडात वाढवल्यामुळे ती कमालीची हट्टी झाली होती. काॅलेजला असतानाच तिचे दिनेशवर प्रेम जडले. […]

उठा, उठा.. ‘मोती’ आंघोळीची..

अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!! […]

नाट्य मंदिरी ‘वसंत’ फुलताना..

सिनेमा जाहिरातीच्या पहिल्या कामापासूनच वसंत आमच्या संपर्कात होता. ‘सासू वरचढ जावई’ हा चित्रपट गजानन सरपोतदारांचा होता, त्यांच्या आधीच्या ‘दुनिया करी सलाम’ चित्रपटापासून त्यांच्या प्राॅडक्शनचे तो काम पहायचा. […]

फराळाचं ताट

चार दिवसांची दिवाळी होऊन गेल्यावर फराळाचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागतात व राहिलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आग्रहाने वाढला जातो… देवदिवाळी पर्यंत फराळ संपलेला असतो व राहतात त्या फक्त गोड आणि खुसखुशीत आठवणी. […]

1 22 23 24 25 26 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..