नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

मीठाचा खडा…

थोरला मुलगा पाचवीला असताना त्याची आई आजारपणात गेली. मास्तरांनी आपल्या मुलांना सावत्र आईचा जाच नको म्हणून दुसरं लग्न केलं नाही. कळता थोरला व मास्तरांनी स्वयंपाक, घरकाम करीत मुलांना मायेनं वाढवलं. शिक्षकांची नोकरी करताना वर्गात व घरात मास्तरांनी मुलांवर चांगलेच संस्कार केले. […]

मालगुडीचे दिवस

आर. के. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यामध्ये गावातील सर्वसामान्य अशा अनेक व्यक्तीरेखा घेऊन त्यांच्या जीवनातील चढ-उतार, आशा-निराशा, आनंद-दुःख, राग-लोभ अप्रतिमरित्या रेखाटले. […]

माळ्याच्या मळ्यामंदी..

२१ जानेवारी २००३ या दिवशी ‘संस्कृती प्रकाशन’, दोन पुस्तकांच्या प्रकाशनानं सुरु झालं. कॅम्पातील नेहरु मेमोरियल हॉलमध्ये प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या शुभदिवशीच सुनील मांडवे उर्फ भाऊ ‘संस्कृती’ परिवारात सामील झाला. […]

चिक्की

कधी मित्रांबरोबर लोणावळ्याला फिरायला गेलेलो असताना तिथे मगनलाल चिक्कीचं मोठं दुकान पाहिलं. आवडणाऱ्या चिक्कीची पॅकेट्स खरेदी केली आणि ती खाताना पुन्हा बालपण आठवलं. […]

सहस्त्र ‘सूर्य’दर्शन

१९६४ पासून ते आजपर्यंत दिडशेहून अधिक नाटकांमध्ये व दोनशेहून अधिक चित्रपटांतून व हेमामालिनी निर्मित ‘तेरा पन्ने’ व मराठी मालिका ‘महाश्वेता’ मध्ये त्यांनी काम केले आहे. […]

महेश माहात्म्य…

पस्तीस वर्षांपूर्वी ऑफिसवर आलेला पोरगेला महेश, आज ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या असंख्य सेलेब्रिटीजना रंगमंचावर आणणारा स्वतःच एक ‘सेलिब्रिटी’ झालेला आहे. […]

यस्. दत्तू

या कारागिरीमागे दत्तूचं एक कसब होतं. त्याला माणसाच्या डोक्याच्या घेरावरुन शरीरयष्टीचा परफेक्ट अंदाज होता.. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, त्याची शरीरयष्टी स्मरणात ठेवून, तो कपड्याचं कटींग करायचा व मुलं शिवणकाम करायची. स्त्रियांच्या खांद्यावरील मापावरुन तो गळा, छाती व बाहीचं माप लक्षात ठेवायचा.. ती भूमिका डोळ्यासमोर आणून त्या त्या व्यक्तींचे कपडे त्यानं बिनचूक शिवून दिले.. पणशीकर खूष झाले, त्यांनी आवर्जून चारूकाकांचे आभार मानले. […]

पुत्र सांगती.. चरित पित्याचे

संगीतकार राम कदम यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ‘चित्रमाऊली’ बॅनरखाली वसंत पेंटर यांच्या सहकार्याने ‘सुगंधी कट्टा’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटास राज्य सरकारचे दहा पुरस्कार मिळाले. […]

सुई-दोरा

खेड्यामध्ये अजूनही दुपारच्या वेळी चार बायका एकत्र येऊन वापरुन झालेले कपडे, साड्या जोडून वाकळा, गोधड्या तयार करतात. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपड्यांपासून तयार झालेले ते एक प्रकारचे नात्यांचे ‘फ्युजन’च असते.. ज्याला घडविणारा असतो तो.. सुई-दोरा! […]

अलाकान

आजपर्यंत १८० चित्रपट करणाऱ्या या रेखा नावाच्या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीने काही अविस्मरणीय चित्रपटही दिले, ज्या चित्रपटांची निर्मिती जणू काही तिच्यासाठीच केलेली होती.. ‘खुबसूरत’ चित्रपटात तिने अल्लड तरुणीची, हलकीफुलकी भूमिका केली. ‘उत्सव’ मधील तिची वसंतसेना कुणीतरी विसरु शकेल का? ‘उमराव जान’ चित्रपटात तर तिने ‘जान’च ओतली आहे.. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील जोहराबाईला, खुद्द लंबूही विसरला नाही, मग आपली काय पत्रास? […]

1 24 25 26 27 28 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..