नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

बुटांचा जोड

सिग्नलला गाडी थांबवली की, काही लहान मुलं, कडेवर मूल घेतलेली बाई, एखादी चौदा पंधरा वर्षांची डस्टबीनच्या पिशव्या विकणारी मुलगी, पिवळ्या चाफ्यांच्या फुलांची वेणी विकणारा तरुण मुलगा हे आळीपाळीने जवळ यायचे. […]

गणेशछाया

संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं. […]

‘चौरंग’चा न्याय!

मी देखील ‘लोकमत’ पेपर सुरु केला. मात्र गेले वर्षभर, रोजचा पेपर उघडूनही पहाण्याचेही धैर्य मला होत नाहीये. […]

‘तिसरा’ डोळा

एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची. […]

‘प्रभात’चा संधिप्रकाश

१९६३ सालची गोष्ट आहे.. सी. विश्वनाथ या दिग्दर्शकाने एस. फत्तेलाल यांना सांगितलं की, आपण मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रीकरण करुयात. त्यासाठी दोघेही मुंबईला पोहोचले. […]

रंगरेषांचं ‘पानिपत’

पेशव्यांची जशी पानिपतच्या लढाईत हार झाली तशीच असाध्य आजाराशी लढता लढता या रंगरेषाकाराचं ‘पानिपत’ झालं. […]

रुपेरी गणेश दर्शन..

श्रीगणेश ही बुद्धीची, कलेची देवता आहे. या कलात्मक स्वप्नांच्या चंदेरी रुपेरी दुनियेत श्रीगणेशाने, रसिक प्रेक्षकांना अनेक चित्रपटांतून दर्शन दिलं असेल तर त्यात नवल ते काय? […]

दर्शनाचा लाभ

गणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात गेल्या चाळीस वर्षांत, दूरदर्शनवर ‘अष्ट विनायक’ हा मराठी चित्रपट न पाहिलेला माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कारण दरवर्षी हा अप्रतिम चित्रपट या दिवसांत दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरुनही हमखास दाखवला जातो आहे.. […]

अनोखा केंद्र

साधारणपणे वीस बावीस वर्षांपूर्वी विजय लहान असताना दर रविवारी आम्ही तिघेही मंडईला जायचो. शनिपारच्या बसस्टाॅपवर उतरलं की, रस्ता ओलांडायचा व पलीकडे जनता सहकारी बँकेकडून कडेकडेने चालू लागायचं. वाटेत गोविंद दाजी जोशी आणि कंपनी यांचे लकडे सुगंधी हे दुकान लागायचं. उदबत्ती, चंदन, कापूर, धूप यांचा संमिश्र वास नाकात शिरायचा. त्याच्यापुढे गेलं की, कोपऱ्यावर मुरलीधर रसवंती गृह. बाहेर […]

वाजवा वाजवा.. टाळ्या वाजवा…

शिवाची आई, मंगल सदानकदा नटूनथटून आपल्या मोबाईलमध्ये चित्रपट पहात असते. ती खुशीत आली की, ‘वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा’ व चिडल्यावर ‘मंगलचा अडकित्ता चाले कट कट कट…’ म्हणते. […]

1 27 28 29 30 31 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..