माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.
२१ जुलै २०१९ रोजी पश्र्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शोर’ चित्रपटातील लता मंगेशकरचं ‘एक प्यार का नगमा है…’ गाणं गाऊन भिक मागणारी रानू मंडल रातोरात सोशल मीडियाच्या जादूने मुंबईच्या मायानगरीची काही काळासाठी पार्श्वगायिका झाली! […]
आता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो…. […]
सदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला. […]
पन्नास साठ वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेच्या बाहेर, फाटकाजवळ गोळीवाले, पेरुवाले, खाऊवाले बसलेले दिसायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मुलांची त्यांच्यावर झुंबड उडायची. […]
नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा. […]