ऐकावे बण्डाजी, वाचावे बण्डाजी!
पंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून […]