नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

माझी प्रवास’साठी’

जन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो. […]

जाम’ची मजा

भाषा हा विषय फार मजेदार आहे. एकाच शब्दाचा अर्थ, तीन वेगवेगळ्या भाषेत कसा बदलत जातो ते पहा. त्याचंच एक उदाहरण बघूयात. शब्द आहे ‘जाम’. […]

जिंदगी धूप, तुम घना साया

१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘चष्मेबद्दूर’ हा हलका फुलका, अप्रतिम चित्रपट आहे. तो अगदी आजही पाहिल्यावर ‘रिफ्रेश’ झाल्यासारखं वाटतं. त्यातील ‘कहासे आये बदरा..’ हे गाणं गाणारी दिप्ती नवल ही अभिनेत्री न वाटता, आपल्या जवळपासच राहणारी साधी मध्यमवर्गीय मुलगी वाटते. […]

शिव’शाई’ झाली शतायुषी

आज बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. आम्हा पुणेकरांचे, ते एक ‘ऐतिहासिक वैभव’च आहे! आमच्या तीन पिढ्यांनी त्यांच्या तोंडून छत्रपतींचे चरित्र ऐकले, पाहिले. […]

फुल खिले है

१९७२ साली भारतात दूरदर्शन सुरु झाल्यावर, पहिल्याच आठवड्यात एका लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’! हा कार्यक्रम सलगपणे तब्बल २१ वर्षे चालला. […]

वृक्षवल्ली

निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत.. […]

‘शरीफ’ बदमाश

तेव्हा ग्रेगरी पेकच्या घोड्यावरती सोनं भरलेल्या पिशव्या असतात व ओमर शरीफच्या पिशव्यांत असतात फक्त दगडं.. या चित्रपटात ओमर शरीफनं ‘बदमाश’ खलनायक रंगवला होता… […]

दिगू टिपणीस

मुख्यमंत्री जीवाजीराव शिंदे हे मंत्री मंडळाचा केलेला विस्तार पत्रकार परिषदेत सांगू लागतात, तेव्हा पत्रकार दिगू टिपणीसला मानसिक धक्का बसतो. त्याने केलेल्या कल्पनेच्या पलीकडचे प्रत्यक्षात घडताना पाहून तो तिरीमिरीत उठतो व मंत्रालयाच्या बाहेर पडतो.. रस्त्यावरील एक भिकारी त्याच्या समोर येऊन हात पसरतो.. दिगू भिकाऱ्याकडे एकटक पाहता पाहता हसू लागतो.. भिकारीही त्याच्या हसण्यात सामील होतो… आणि ‘समाप्त’ ची पाटी पडद्यावर झळकते.. […]

नाती ‘रस’वंती

नाती असावीत देवाला दाखविलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण प्रत्येक पदार्थ करताना ते वापरलेलं असतंच. हे चवीपुरतं मीठ असावंच लागतं.. काही नाती या मीठासारखीच जीवनाला चवदार बनवतात.. […]

भिकारी

मध्यंतरी वर्तमानपत्रात बालाजी देवस्थान येथील एका भिकाऱ्याची बातमी आली होती. हा भिकारी बालाजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मागे लागून त्यांना पैसे मागायचा. अशी त्यानं अनेक वर्षे भीक मागून जिंदगी घालवली. नुकताच त्याचा मृत्यू झाल्यावर पोलीसांनी त्याच्या झोपडीची झडती घेतली, तेव्हा लाखो रुपयांची रोकड त्यांना मिळाली. एवढे रुपये जवळ असताना, त्याला भीक मागणे सोडून द्यावे, असं कदापिही वाटलं नाही… कारण, काहीही कष्ट न करता, पैसे मिळविण्याचे त्याला जडलेलं ‘व्यसन’!! […]

1 32 33 34 35 36 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..