ख’वट सावित्री
वर्षातून एकदाच येणारा, माझा ‘वट पौर्णिमेचा सण’ या तमाम मराठी मालिकावाल्यांनी, त्यांच्या कथानकातील ‘कट कारस्थानां’नी उधळून लावलाय.. पूर्वी साधंसुधं ‘दूरदर्शन’ असताना वट सावित्रीच्या व्रत वैकल्याचे, या दिवशी गोडवे गायले जायचे. या दिवसाचं निमित्त साधून वट पौर्णिमेचं एखादं गाणं किंवा प्रसंग असलेला मराठी चित्रपट आवर्जून दाखवले जायचे. त्याकाळातील सुलोचना, आशा काळे, इंदुमती पैंगणकर, उमा भेंडे, अलका कुबल, इ. सोज्वळ नायिका, मला प्रसन्न करण्यासाठी वडाच्या झाडाला धागा गुंडाळत, भक्तीभावाने सुमधुर गाणी म्हणायच्या..मला अगदी कृतकृत्य वाटायचं.. […]