Articles by सुरेश नावडकर
‘इस्त्री’ ची घडी
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी. […]
हां बाबू, ये ‘सर्कस’ है
भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले. […]
देवदूत दिन
पूर्वी राजे महाराजे आपल्या पदरी राजवैद्य ठेवायचे. ते नाडी परीक्षा करुन, जडीबुटीची औषध देऊन उपचार करायचे. कालांतराने आजारांवर नवीन औषधे निघाली. इंजेक्शन देऊन उपचार होऊ लागले. […]
“छत्री धर”
पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या. […]
जान बचीं, लाखों गये
शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच. […]
मुक्या प्राण्यांची ‘बोलकी’ सोबत
गावी जवळपासच्या घरात शेळ्या असायच्याच. त्यांची काळी कुळकुळीत दोन चार करडं (लहान पिल्लं) आपल्या आईच्या आसपास एकाच वेळी चारही पाय वरती घेऊन उड्या मारताना दिसायची. त्यांना पकडून त्यांच्या लोंबणाऱ्या, रेशमी मुलायम कानांना स्पर्श करताना आनंद मिळत असे. त्या करडांना पकडले की, शेळी डोळे मोठे करुन माझ्या ‘जगावेगळ्या’ कृतीकडे पहात रहायची. […]
वन्स अपाॅन अ ‘Time’
राहुल टॉकीजला ग्रेगरी पेकचा ‘मेकॅनाज गोल्ड’ चित्रपट एकदा पाहून समाधान झालं नाही, म्हणून पुन्हा पाहिला. मग तसेच काऊबॉईजच्या पठडीतले, ‘वन्स अपॉन टाईम इन द वेस्ट’, ‘रेडसन’, ‘मॅग्निफिशियंट सेव्हन’ ‘रिव्हेंज’ असे चित्रपट पाहिले. क्लींट इस्टवुड, बड स्पेनर, स्पेन्सर ट्रेसी या त्रिकूटाचे अनेक चित्रपट पाहिले. संपूर्ण जगाला कुंग फू कराटेचे वेड लावलेल्या ब्रुस ली चा ‘एन्टर द ड्रॅगन’ राहुलमध्येच ब्लॅकने तिकीट घेऊन पाहिला. […]
लावणीची ‘लाट’
‘सांगते ऐका’ चित्रपटातील ‘ बुगडी माझी, सांडली गंऽऽ’ ही लावणी गाजल्यानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. हंसा वाडकर, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक, जयश्री टी, सुषमा शिरोमणी, रंजना अशा अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटातील लावण्यांनी रसिकांना वेड लावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातून संध्या या अभिनेत्रीने सादर केलेल्या लावण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. […]