न्हाऊ घाल माझ्या मना
प्राणी असो वा पक्षी, त्यांना आंघोळ ही फार प्रिय असते. चिमण्यां थोड्याशा पाण्यात सुद्धा डुबक्या मारुन पंख फडफडवीत आंघोळ करतात. कावळ्याला चार थेंब मिळाले तरी त्याची आंघोळ पूर्ण होते. हत्तीला डुंबायला भरपूर पाणी लागते. म्हशींना एखाद्या डबक्यात गळ्यापर्यंत डुबवून घेतले की, बाहेर यायची इच्छा नसते. मांजर ही आंघोळीच्या ऐवजी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ करुन पाण्याची बचत करते. […]