चलो, बुलावा आया है…
माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता. […]
माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता. […]
कोणत्याही आईला आपलं मूल हे गोरं किंवा काळंबेद्रं असलं तरी ते सर्वांत प्रिय असतं. मग तो मुलगा असो वा मुलगी. खेड्यातील असो वा शहरातील. तिची मानसिकता एकच असते, आपल्या मुलाला कुणाच्याही वाईट ‘नजरे’ची दृष्ट लागू नये. दृष्ट लागणे, ही गोष्ट आजच्या पिढीला अंधश्रद्धा वाटू शकते. […]
शोले’ नंतर त्यांनी ‘डाॅन’, ‘करण अर्जुन’, ‘गजनी’, ‘शान’, ‘लगान’, ‘सुपरमॅन’ असे धम्माल चित्रपट काढले. ही कल्पना सुचली, नासीर शेख नावाच्या युवकाला. तो एक स्वतःचं व्हिडीओ पार्लर चालवत होता. साहजिकच त्याने व्यवसायाच्या निमित्ताने अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहिले. […]
मद्रासमधील चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत दोघांचे सूर जुळले व राजा परांजपे यांचे सोबत तो तरुण पुण्याला आला व त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून सहायक दिग्दर्शक म्हणून त्याने चित्रपट सृष्टीतील ‘श्रीगणेशा’ केला… तो तरुण म्हणजेच आज नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, ऋषितुल्य राजदत्तजी!!! […]
१९५१ साली राज कपूरचा ‘आवारा’ प्रदर्शित झाला. त्यातील ‘घर आया, मेरा परदेसी..’ या स्वप्नगीताला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्या गाण्यासाठी मोठमोठ्या मूर्ती, मनोरे, मुखवटे, एलिफंटा येथील त्रिमूर्तीचे सेट्स उभे केले होते. कृत्रिम धुराच्या सहाय्याने सेटवर स्वर्गीय वातावरण निर्मिती केलेली होती. जेव्हा हे गाणं संपतं तेव्हा त्या मूर्तीं पडतात असे दाखविले होते. हे कलादिग्दर्शन केलं होतं, राजकपूरचे सर्वाधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे महाराष्ट्राचे महान चित्रकार मुरलीधर रामचंद्र आचरेकर यांनी! […]
फेसबुकवर आज एक पोस्ट वाचनात आली. निवृत्तीला आलेल्या एका गृहस्थांनी, निवृत्तीनंतर पत्नीसह स्वतंत्र राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट घेऊन ठेवला होता. मुलाचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न लावून दिल्यावर ते दोघे पती-पत्नी दोन्ही वेळच्या जेवणासाठी एकत्र येऊन नंतर आपल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यावर सुनेने विचारले, ‘मला सर्वजण नावं ठेवतील, माझ्या त्रासामुळे तुम्ही स्वतंत्र राहू लागलात म्हणून. […]
त्या बारा वर्षांच्या गीताचे वडील म्हणजेच ज्येष्ठ चित्रकार व कलागुरू सावळाराम लक्ष्मण हळदणकर! १९२९ साली काढलेले ते ‘ग्लो आॅफ होप’ हे चित्र आज म्हैसूर येथील जगमोहन पॅलेस मधील जयचमा राजेंद्र आर्ट गॅलरीत पहायला मिळते. हळदणकरांना हे चित्र काढण्यासाठी, गीताला रोज तीन तास असे तीन दिवस समई हातात धरुन त्या पोजमध्ये उभे करावे लागले होते. या चित्राचे एक दुर्दैव असे आहे की, कित्येकजण या चित्राचे श्रेय राजा रविवर्माला देतात, जे चुकीचं आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions