लेडी विथ द लॅम्प
१८२० साली इटलीमध्ये फ्लाॅरेन्स येथे नाइटिंगेलचा जन्म झाला. वयाच्या ३३व्या वर्षी १८५३ मध्ये झालेल्या क्राइमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची तिने अहोरात्र शुश्रुषा केली. रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांना शांत झोप लागली आहे का? हे ती प्रत्येक खाटेजवळ जाऊन पहात असे. इतकी तिने त्या जखमी सैनिकांची सेवाभावाने काळजी घेतली म्हणून तिला ‘लेडी विथ द लॅम्प’ असे संबोधले जाऊ लागले. […]