चित्रतपस्वी साबानंद मोनप्पा
१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला. […]