लेट व्हॅलेंटाईन
परवा माझा मोबाईल बंद पडला होता, त्यामुळे दोन दिवस मी त्याला हातही लावला नाही. आज दुरुस्त केल्यानंतर पाहिलं तर व्हाॅटसअपवर धाड धाड मेसेजेस पडत राहिले. त्यातील मी मुंबईला नोकरीला असणाऱ्या माझ्या एकुलत्या एक मुलाचा व्हाॅटसअप उघडला, तर त्याने लांबलचक पाठवलेला मेसेज दिसला. मी माझा चष्मा नाकावर चढवला व वाचू लागलो… ‘प्रिय बाबा, आज आम्ही दोघेही बाहेर […]