नवीन लेखन...
Avatar
About सुषमा मोहिते
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

जाणून घ्या, कोणत्या दिशेला डोके ठेवून का झोपू नये

आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग शयन आहे. शयन म्हणजे झोप. मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-झुडपं सर्वजण शयन करतात. झोप कशाप्रकारे आल्या स्वास्थ्य आणि चेतनेसाठी लाभदायक ठरू शकते, यासाठी शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. झोपताना पाय दक्षिणेकडे असू नयेत आणि उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपू नये. अशा स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, […]

परसबाग

फलभाज्या, पालेभाज्या ताज्या आणि स्वस्त मिळण्याचे दिवस आता संपले. तुमच्या छोट्याश्या अंगणातून तुम्हाला रोज लागणाऱ्या भाज्या ताज्या आणि स्वस्तात सहज मिळवता येतील. बाग म्हटली म्हणजे ती लहान असो, मोठी असो, त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. बागेची आवड नसणारे क्वचितच सापडतात. छोटेसे घरकुल त्याभोवती बाग असली की घराला काही वेगळेच स्वरूप येते. आवड आहे. पण जागा […]

वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी

वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत. वयोमानामुळे घडत जाणारे बदल मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते. खरे तर ही अडचण कोणत्याही वयात येऊ शकते. परंतु वृद्धत्त्वामधे सर्वात जास्त दिसते. मूळव्याध, […]

वार्धक्यातील आहार

सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतू त्यासाठी जठराग्नि चांगला प्रदिप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते. यातही म्हातारपणी अडथळे येतात. उदा. दातांचा अभाव, आर्थिक अडचणीमुळे आहार हा सर्व गुणसंपन्न मिळू शकत नाही. तसेच स्त्रियांना काटकसरी धोरणामुळे शिळे अन्न खाण्याची सवय असते. म्हातारपणी काय करायचे जिभेचे चोचले, वगैरे विचारधारणेमुळे शरीराकडून […]

आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू […]

आरोग्यदायी कडूलिंब

भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव अॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो. कडू लिंब: पाने वफुलोरा.मध्यम आकाराच्याकडू लिंबाच्या वृक्षाची […]

शिकेकाई – बहुगुणी वनस्पती

ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व उ. कारवार, आंध्र प्रदेश, आसाम व बिहार), तसेच चीन, मलाया व म्यानमार या देशांत आढळते. बाजारात ‘शिकेकाई’ या नावाने तिच्या शेंगा मिळतात. ⇨ बाभूळ, ⇨ खैर व ⇨ हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. ह्या वनस्पतींच्याअॅकेशिया ह्या प्रजातीतील […]

धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध बेल

बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही. अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. “बिल्वे शाण्डिल्यशैलूषौ मलूरश्रीफ़लावपि” अशी वर्णनं अमरकोशात या झाडाची केली आहेत. Rutaceae ह्या लिंबू कुळाचा सदस्य असलेलं हे झाड, वनस्पतीशास्त्रात […]

अशी घ्या डोळ्यांची काळजी

सुंदर जग पाहण्याची किमया आपण फक्त डोळ्यांनीच करू शकतो. म्हणूनच डोळ्यांचे आपल्या जीवनामधील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. मात्र असे असतानाही आपण डोळ्यांची काळजी घेण्याबाबत तितकेसे सिरिअस नसतो. डोळ्यांची कार्यक्षमता, आरोग्य राखलं तर आपलंच भविष्य सुखकारक होईल म्हणून डोळ्यांची आत्तापासूनच काळजी घ्या… ती कशी यावर नजर टाकुयात… पुरेशी झोप घ्यावी यासाठी रात्री जागरण करु नये व दिवसा […]

डैंड्रफ (कोंडा) संपवा एलोवेराने

ज्याच्या डोक्यात डैंड्रफ असतो त्याला बर्‍याचवेळा आपली मान खाली टाकावी लागते. डोक्यात पांढर्‍या रंगाचा कोंडा प्रत्येकाला दिसून येतो. जर तुमच्या डोक्यात कोंडा आहे आणि तुम्ही हजारो शँपू आणि तेल लावून लावून त्रस्त झाले असाल तर, एलोवेरा ट्राय करा. एलोवेरा जेल डोक्याच्या त्वचेला नमी पोहोचवते, ज्यामुळे डोक्यातील ड्रायनेस पूर्णपणे ठीक होण्यास मदत मिळते. कोंडा एक प्रकारचा फंगस […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..