आजचा आरोग्य विचार – भाग चौतीस
६७. आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे. फळाविषयी सविस्तर माहिती यापूर्वी झाली आहे. ६८. गोड पदार्थानी आहाराची सुरवात करावी, आज आंबट तिखट सूप प्यायले जाते. जे अॅपेटायझर […]