आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस
४५.सकाळी ऊठून दंड जोर बैठका मारून, मुद्गल फिरून, दंडाच्या बेटकुळ्या हलवून दाखवणारी आमची पिढी आणि पोटावर सिक्स पॅक दाखवणारी आजची पिढी. केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक […]