इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चार
आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला “समाधान” म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर “माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही” अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात. […]