नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

आजचा आरोग्य विचार – भाग पंधरा

१५. मलविसर्जन करताना एकेकाळी उकीडवे बसून केले जात असे. उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य […]

आजचा आरोग्य विचार – भाग चौदा

दंतमंजनाविषयी मागे बराच उहापोह झालेला असल्याने आता पुनः भारतीय दंतमंजनाविषयी लिहीत नाही. प्रत्येक कृतीमधे आपण भारतीयत्वापासून कसे लांब जातोय, आणि भारतीयत्वापासून लांब जाणे म्हणजे आरोग्यापासून लांब जाणे, कारण भारतीयत्व म्हणजे संपूर्ण आरोग्य हे लक्षात आणून देणारी ही लेखमाला आहे, याची एकदा आठवण करून देतो. आपण भारतीय असल्याचा आनंद नक्कीच व्हायला हवा. गेले ते दिन गेले, असे […]

आजचा आरोग्य विचार – भाग तेरा

सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची. पहिल्यापासूनच निर्गुणाची उपासना केली तर त्याचे परिणाम वेगळे दिसतात. हिंदु धर्मामधे तर तेहेतीस कोटी (कोटी म्हणजे […]

आजचा आरोग्य विचार – भाग बारा

चला ! सुप्रभात ! आज जाग तर आली. जाग आली की जागं केलं गेलं ??? म्हणून तर एवढा आनंद झाला. तब्बल आठ दहा तास मी माझ्यामधे एकरूप झालो होतो. जगाचा मला विसर पडला होता. पुनः या मायेच्या दुनियेत मला आणल्याबद्दल झालेला आनंद मी रोज व्यक्त करतोय. नाहीतर झोप आणि मृत्यु यात तसा काही फरकच नसतो. झोप […]

आजचा आरोग्य विचार – भाग अकरा

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदा प्रभाते करदर्शनम् । सकाळी उठल्यावर सर्वात पहिले आपले तळहात पहावेत. जे हात कष्ट करून पैसे मिळवणार आहेत, या हातानीच लेखन करून सरस्वतीला प्रसन्न करणार आहोत, तर शत्रूशी लढून स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबातील सर्वांचे संरक्षण करून शांती प्रस्थापित करणारी पार्वती, ह्याच हातामधे विराजमान असते, याची सकाळी सकाळी आठवण करून, नेहेमीच […]

आजचा आरोग्य विचार – भाग दहा

१०. झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते. रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत. खळखळून चुळा भराव्यात आणि… परत काहीही तोंडात न टाकता झोपावे. ?? दंतमंजन कोणतेही असो, ते चवीला गोड अजिबात नको, तोंडाला फेस आणणारे नको, आणि रंगाला पांढरे नको. थोडे […]

आजचा आरोग्य विचार – भाग नऊ

भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही. ही सर्व मंडळी गाद्यागिरद्या वापरणारीच असतील कदाचित पण अति नको हे मात्र खरं. ९. झोपण्यापूर्वी हात पाय धुवुन झोपावे. पण हात पाय ओले ठेवून अजिबात […]

आजचा आरोग्य विचार – भाग आठ

आपल्या लक्षात येतंय का ? आपण काय काय भारतीयत्व गमावलंय ते ! १. ब्राह्म मुहुर्तावर उठणे विसरलो आणि उशीरा उठायला सुरवात केली. २. रात्री लवकर झोपायची आपली परंपरा सोडून जागरणाच्या नादी लागलो ३.प्रत्येकाचे अंथरुण वेगळे असावे ४.दात घासण्याचे दंतमंजन विसरलो आणि रासायनिक टूथपेस्टने फेस काढायला लागलो. ५.दात घासायची काडी विसरून, प्लॅस्टीकचा टूथब्रश तोंडात फिरवायला लागलो. ६.घट्ट […]

आजचा आरोग्य विचार – भाग सात

प्रत्येकाचा बिछाना वेगळा तसा, पांघरुण पण वेगळं. आजीच्या जुन्या नऊवारी सुती साडीची हाती शिवून केलेल्या गोधडीची उब काही वेगळीच असते ना ! प्रत्येकाची गोधडी पण वेगळी. लहान बाळाकरीता तयार केलेली रंगीबेरंगी दुपटी म्हणजे या गोधडीचे जणु बाळच ! ही दुपटी नवीन साडी घेऊन शिवायचीच नसतात. ही साडी जुनी वापरलेलीच हवी. एका बाळासाठी वापरलेली दुपटीदेखील परत परत […]

आजचा आरोग्य विचार – भाग सहा

बिछाना कसा असावा ? तर ज्यावर शांत झोप लागेल असा, पाठीला पूर्ण आराम मिळेल असा, ओबडधोबड नसलेला आणि स्वच्छ धुतलेला असावा. भारतीय परंपरेतील बिछाना हा असाच होता. जमिनीवर अथवा एका लाकडी बाकावर पथारी पसरायची की झाले ! त्यावर एखादी चटई, धाबळी, घोंगडी, सतरंजी, गोधडी, रजई, किंवा शाल. झोपल्यानंतर इंग्रजी एस आकाराचा पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीला समांतर […]

1 2 3 4 5 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..