नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

याला जीवन ऐसे नाव भाग ३२

अग्नि महत्वाचा ! ‘अग्निमिळे’ या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व ! पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा. हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत. सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३१

शास्त्रकार स्पष्टपणे सांगत आहेत. अतियोगेन सलिलं तृष्यतोऽपि प्रयोजितम प्रयाति श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः। वर्धति आमतृष्णानिद्रा तंद्रा ध्मानांग गौरवम कासाग्निसादह्रल्लासप्रसेक श्वास पीनसम् ।। तहान लागली असताना सुद्धा ती ओळखता यायला हवी, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यावे, पण जर का यावेळी देखील पाणी जास्त प्यायले गेले तर कफ आणि पित्त प्रकुपित होतात, म्हणजे वाढतात. विशेषत्वाने ताप आला असताना […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३०

पाणी शुद्धीकरण भाग दहा ज्या भागातील पाणी पचायला खूप जड असते, अशा भागात पाणी खूप उकळावे लागते. एक सोळांश करावे. देश ऋतु, रोग यानुसार पाण्याची शुद्धी किती करायची हे ठरवून पाणी एक अष्टमांश, एक चतुर्थांश, किंवा तीन भागातील एक भाग आटवून दोन शिल्लक ठेवावे, वा निम्मे आटवावे. या प्रकारे शुद्ध केलेले पाणी वेगवेगळ्या गुणाचे असते. पाणी […]

याला जीवन ऐसे नाव भाग २९

पाणी शुद्धीकरण भाग नऊ या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ? ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण […]

याला जीवन ऐसे नाव भाग २८

पाणी शुद्धीकरण भाग आठ पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात. अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे […]

याला जीवन ऐसे नाव भाग २७

पाणी शुद्धीकरण भाग सात आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते. हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ? ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध […]

याला जीवन ऐसे नाव भाग २६

पाणी शुद्धीकरण भाग सहा काल काही प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे म्हणजेच आजची टीप होऊ शकेल. शुद्ध पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. आता पाणीच दुर्मिळ होत चालले आहे, असे म्हटले तरी चुकणार नाही. यावर्षी पाऊस चांगला झाला पण नियोजनाअभावी निसर्गातून आलेले पाणी तसेच वाया घालवले. हेच नभज, आंतरीक्षज, ऐंद्रज म्हणजे ढगातून जन्मलेले, अंतरीक्षातून आलेले किंवा […]

याला जीवन ऐसे नाव भाग २५

पाणी शुद्धीकरण भाग पाच पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे. त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील. एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे […]

याला जीवन ऐसे नाव भाग २४

पाणी शुद्धीकरण भाग चार पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात. दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. […]

याला जीवन ऐसे नाव भाग २२

पाणी शुद्धीकरण भाग दोन पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, “पाणी शुद्ध कसे करा” हे मात्र सांगितले जात नाही. “इट इज नाॅट अवर बिझनेस” असं म्हटलं की विषय संपत नाही राव ! आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे […]

1 29 30 31 32 33 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..