आहारातील बदल भाग ४७ – चवदार आहार -भाग ८
सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात. सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे. सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे. किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते. ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते. […]