नैवेद्य भाग ३
प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा ! ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य ! जसे, गणपतीला तूप आणि मोदक. मोदकच का ? मोदकाचे सारण गुळ आणि खोबरे. गुळ आणि खोबरे आणि त्यावर साजूक तूप हा उत्तम बुद्धीवर्धक योग आहे. गुळामुळे रक्तपेशी वाढायलाही मदत होते. सर्वात पहिला रस धातु तयार होण्यासाठी, गेलेला थकवा लगेचच परत मिळवण्यासाठी, गुळ मदत करतो. […]