नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग सहा

एखादी अमंगल म्हणजे वाईट गोष्ट अथवा वस्तूची सावलीही ओलांडून जाऊ नये. राख, तृण, विष्ठा, उष्टे खरकटे, पवित्र दगड, वारुळाची माती, एखाद्याच्या नावाने दिलेला बली, विनाकारण ओलांडून जाऊ नये. एखाद्याने स्नान केलेली जागा देखील ओलांडू नये. […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पाच

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे सत्तेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पाच शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये. गरज लागल्यास कोणाला तरी सोबत घेऊन जावे, म्हणजे अपघात, चोर, शत्रू, यांच्यापासून भय राहात नाही. रात्रौ घराबाहेर जाताना डोक्यावर शिरस्त्राण घालूनच बाहेर पडावे. दिवसा तशी आवश्यकता नाही. भर दुपारी, सूर्योदय […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चार

बाहेर जाताना पायात चप्पल, हातात काठी, आणि छत्री घेऊन बाहेर पडावे. जमिनीवरील दगड माती, काटे, चिखल, पायांना लागू नये, आपल्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे, म्हणून हे सर्व पहावे, असे ग्रंथकारांना सांगायचे आहे. वरवर पहाता ” एवढे काय सांगायचे त्यात, एवढे बुद्धु नाही आम्ही” असं वाटणं चुक नाही. पण अश्या अनेक जागा आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत, जिथून आपल्याला धोका संभवू शकतो. […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग तीन

आपले कार्य उत्तम व्हावे असे वाटत असेल तर कल्याणकारी रत्न, गुरु, माता पिता, आदि पूज्य व्यक्ती, यांना वंदन करून, तसेच तूप खाऊन बाहेर पडावे. मुद्दाम हा विषय इथे सांगण्याचे कारण आज तुपाला एवढी नावं ठेवली जातात, इथपर्यंत मजल पोचली आहे, की तुप म्हणजे जणु काही विषच म्हणे ! घोर कलियुग म्हणतात, ते हेच. […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग दोन

मल, मूत्र, ढेकर, शिंका, अश्रु, तहान, भूक इ. तेरा वेग सांगितलेले आहेत. यांना कधीही अडवू नये. जेव्हा हे वेग आतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा जबरदस्तीने यांना अडवून धरू नये. लगेचच त्यांना मोकळे करावे. […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग एक

आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन ! […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस बाबा सांगतात… सांगेन गोष्टी हिताच्याच चार…. निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे. तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला “जीवन” असा आणखी […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस बाबा सांगतात… हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे. संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे. प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे “मित मधु भाषण” असावे. श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस बाबा सांगतात… आपले नुकसान करणाऱ्या शत्रुवरही प्रायः उपकारच करावा. यातील “प्रायः” हा शब्द महत्त्वाचा ! या शब्दाला विशेष महत्त्व आहे. हा शब्द नसता तर अनर्थ झाला असता. आजच्या भाषेत गांधीगिरी करावी. महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील झालेल्या युद्धांचा विचार करता, […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बत्तीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेअडतीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बत्तीस बाबा सांगतात… देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये. आणि कठोर शब्दांनी बोलू नये. राजाला योग्य तो मान दिलाच पाहिजे. जरी लोकशाही असली तरी तो लोकमान्य लोकनेता आहे. […]

1 4 5 6 7 8 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..