मातीमध्ये हात घालतो त्याला कळते (गझल)
मातीमध्ये हात घालतो त्याला कळते मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ? जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते दिशा एकही राहत नाही हातामध्ये तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते ©®_ […]