श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ३
भगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो. […]