श्री शिव नामावल्यष्टकम् – ५
वारणा आणि असी अशा दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्राला वाराणसी असे म्हणतात. त्या श्री क्षेत्र काशी ची देवता आहे भगवान श्री विश्वनाथ. […]
वारणा आणि असी अशा दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्राला वाराणसी असे म्हणतात. त्या श्री क्षेत्र काशी ची देवता आहे भगवान श्री विश्वनाथ. […]
विश्व शब्दाचा अर्थ आहे पसरलेले. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे स्वामी असल्यामुळे भगवंताला विश्वनाथ असे म्हणतात. […]
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे. […]
हे पार्वतीहृदयवल्लभ – हे संबोधन मोठे मजेदार आहे. यातील हृदयवल्लभ शब्द पार्वतीसह वापरला तर पार्वती च्या हृदयाला अत्यंत प्रिय असणारे असा अर्थ होतो आणि पार्वती आणि हृदयवल्लभ हे शब्द वेगळे केले तर ज्यांच्या हृदयाला पार्वती अत्यंत प्रिय आहे असा अर्थ होतो. […]
हे चन्द्रचूड मदनान्तक शूलपाणे स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो । भूतेश भीतभयसूदन मामनाथं संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥ भारतीय संस्कृतीमध्ये, उपासनेचा क्षेत्रामध्ये नामा ला प्रचंड महत्त्व आहे. सर्वच देवतांच्या सर्व पंथात, संप्रदायात नामस्मरण ही समान गोष्ट आहे. भगवंताच्या विविध नामांमधून त्याच्या विविध गुणांचे वर्णन केलेले असते. स्वरूपाचे निर्देशन केलेले असते. याच कारणाने नामस्मरणाचे हे महत्त्व लक्षात […]
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात, […]
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः । लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥ या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं – पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे […]
जगणे आणि जिवंत असणे या दोन मध्ये फरक आहे. केवळ श्वास घेणे म्हणजे जगणे नव्हे. उदरभरण तर पशु पक्षांचे देखील चालतेच. मात्र त्यासाठी खालील गोष्टी करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये. ही आचार्यश्रींची मागणी अनेक अर्थाने चिंतनीय आहे. […]
किं यानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् । ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् ॥१३॥ आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवान श्री शंकराची कृपा हीच खरी प्राप्ती आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्री म्हणतात, किं यानेन – प्रवासाची सुखकारक साधने असून काय? धनेन – प्रचुर स्वरूपात धन असून काय? […]
चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे । दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥१२॥ भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाला आपल्या समोर ठेवताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात, चन्द्रोदभासितशेखरे – मस्तकावरील चंद्रामुळे ज्यांचा शिरोप्रदेश उजळून निघाला आहे असे. मस्तकावरील चंद्र हे वेगळ्या अर्थाने मस्तकाच्या उज्ज्वलतेचे, शांततेचे, प्रसन्नतेचे, शीतलतेचे प्रतीक. स्मरहरे – स्मर म्हणजे भगवान […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions