श्री मीनाक्षी पंचरत्नम् – ३
श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायकीम् । श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ३॥ श्रीविद्यां- आई जगदंबेच्या तात्त्विक स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या शास्त्राला श्रीविद्या असे म्हणतात. शिववामभागनिलयां- भगवान शंकरांच्या अर्ध्या डाव्या भागामध्ये निवास करणारी. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचा विचार करताना शास्त्रात पुरुषाचे उजवे तर स्त्रीचे डावे अंग पवित्र स्वरूपात वर्णन केले आहे. पुरुष सामान्यतः बुद्धिप्रधान असतो […]