गौरीदशकम् – ४
आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं भूते भूते भूतकदम्बप्रसवित्रीम् । शब्दब्रह्मानन्दमयीं तां तटिदाभां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ४॥ आई जगदंबेचे अतुलनीय वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं- अ पासून क्ष पर्यंत सर्व अक्षरांच्या स्वरूपात विलास करणारी. यामध्ये अ पासून म्हणतांना सर्व अक्षरांपासून तर क्ष पर्यंत म्हणताना सर्व जोडाक्षरां पर्यंत असा भाव अंतर्हित आहे. सामान्य शब्दात सकल विद्या, सकल ज्ञान. सर्व शास्त्र […]