श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ५
प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति। श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥ पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे. […]