नवीन लेखन...
प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

श्री कनकधारा स्तोत्रम् – १३

सम्पत्कराणि सकलेन्द्रिय नन्दनानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि।त्वद्वंदनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये।।1१३।। मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी. सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी. येथे केवळ […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १२

नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै । नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।। आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत. त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत. आचार्य श्री म्हणतात, नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ११

श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतानायै पुष्टयै नमोऽस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।११।। विविध रूपामध्ये भक्त कल्याणाचे कार्य करणाऱ्या श्रीमहालक्ष्मीच्या चार विविध रूपांचे वर्णन आचार्यश्री येथे करीत आहेत. श्रुती, रती, शक्ती आणि पुष्टी अशा चार रूपात आई जगदंबेचे कार्य चालते. त्यांना वंदन करतांना आचार्यश्री त्यांच्या कार्याचे स्वरूपही स्पष्ट करीत आहेत. श्रुत्यै नमोऽस्तु- आईच्या श्रुती […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १०

गीर्देवतैति गरुड़ध्वज सुंदरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति। सृष्टि-स्थिति-प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै ।।१०।। आई आदिशक्ती परांबेचे कार्य तीन प्रकारे चालत असते. या तीन पद्धतींनाच त्रिगुण असे म्हणतात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या द्वारे कार्य करणाऱ्या आदिशक्तीच्या तीन रूपांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे म्हणतात. या तीन रूपात कार्य करणाऱ्या तीन शक्तींचे वर्णन येथे आचार्यश्री करीत […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ९

इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-दृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते। दृष्टि: प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टराया:।।९।। इष्टाविशिष्टमतयोऽपि- इष्ट म्हणजे आवश्यक असलेली‌. विशिष्ट अर्थात योग्य प्रकारची. त्याला अ उपसर्ग लावला. अर्थात विशिष्ट प्रकारची नसलेली. मती म्हणजे बुद्धी. अपि म्हणजे सुद्धा. एकत्रित अर्थ केला तर ‘आवश्यक असणारी विशिष्ट प्रकारची बुद्धी नसली तरीसुद्धा.’ यया दयार्द्रदृष्टया- जिच्या दयापूर्ण दृष्टीने. त्रिविष्टपपदं – स्वर्गातील स्थान. सुलभं […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ८

दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम- स्मिन्नकिञ्चन विहङ्ग शिशौ विषण्णे।दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:।।८।। आई भगवतीच्या कृपादृष्टी वर्षावाचा विचार मनात आल्यानंतर पूज्यपाद आचार्यश्री त्या वर्षावाशी संबंधित अन्य गोष्टींचा विचार एकत्रित करून उपमासौंदर्य साधत आहेत. नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:- हा मेघ सामान्य नाही. आई जगदंबेच्या कृपादृष्टीचा हा मेघ. कशी आहे आई जगदंबा, तर नारायण प्रणयिनी. भगवान श्री विष्णूची प्रियतमा. त्यातही नारायण शब्द वापरणारी आचार्यश्रींची प्रतिभा […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ७

प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमाथिनि मन्मथेन। मय्यापतेत्दिह मन्थर मीक्षणार्द्धं मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।७।। प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्- पद शब्दाचा अर्थ स्थान. प्राप्त म्हणजे उपलब्ध होणे. प्रथमतः अर्थात पहिल्याच वेळी. किल यत्प्रभावात् अर्थात तिच्या प्रभावामुळे. मांगल्यभाजि- अर्थात सकलम मंगलाचे पात्र, अधिष्ठान असणारे. मधुमाथिनि- मधु नावाच्या दैत्याचे मथन अर्थात विनाश करणारे जे भगवान विष्णू त्यांच्यात, अर्थात […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ६

कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे-र्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्। मातु: समस्त जगतां महनीय मूर्ति भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।६।। कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे- अंबु म्हणजे पाणी. ते देणारा तो अंबुद म्हणजे ढग. ढगांचा खरा काळ पावसाळा. त्या काळातील ढग काळेशार असतात. त्यांची अली म्हणजे रांग. एकामागोमाग एक आल्यामुळे विशाल समूह वाटणाऱ्या आणि अत्यंत काळेशार दिसणाऱ्या. कैटभारे:- कैटभ नावाच्या राक्षसाचे अरि म्हणजे शत्रू अर्थात […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ५

बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरि‍नीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।। बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती. मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु. विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ४

आमीलिताक्षमधिगम्य मुदामुकुन्द-मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्। आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयनाङ्गनाया:।।४।। आनंदकंद म्हणजे आनंदाचा जणू भरगच्च संग्रह. मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे, भगवान श्रीहरी. त्यांना मुदा म्हणजे आपल्याच आनंदात, आमीलिताक्षमधिगम्य डोळे मिटून शांत पहुडलेले पाहून, अनिमेषमनङ्गतन्त्रम्- अनिमिष अर्थात पापणी देखील न ललवता. अनंग म्हणजे भगवान मदन. त्यांचे तंत्र म्हणजे प्रेम. सगळ्याचा एकत्रित विचार करता आनंदकंद भगवान श्रीहरी आपल्याच आनंदात नेत्र मिटून बसलेले […]

1 29 30 31 32 33 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..