श्री कनकधारा स्तोत्रम् – ३
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि । ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध- मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥ आई महालक्ष्मीच्या त्या नेत्र कटाक्षाचा अद्भुत महिमा सांगताना आचार्यश्री म्हणतात, विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्- विश्व अर्थात जग. अमर अर्थात देवता. इंद्र अर्थात सर्वश्रेष्ठ, राजा. त्याचे पद म्हणजे अधिकार. अर्थात या जगाचाच नव्हे तर देवांचाही राजा असलेल्या इंद्राच्या पदाचा अधिकार. आई जगदंबेच्या नेत्र कटाक्षाने असे देवराज इंद्राचे पद देखील […]