नवीन लेखन...
प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

श्रीबुद्धी नवरात्रोत्सव

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात. […]

श्रीमुद्गलपुराण – ११

असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात. […]

श्री गणेश अवतारलीला ११ – श्री वल्लभेश अवतार

निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय. […]

मोरया माझा – ११ : श्री गणेश खरेच शिवपुत्र आहेत का?

दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही. […]

श्रीमुद्गलपुराण – १०

भगवान श्री शंकरांनी स्थापिलेले श्री क्षेत्र रांजणगाव, भगवान श्री विष्णूंनी तपस्या केलेले श्रीक्षेत्र सिद्धटेक, भगवान ब्रह्मदेवांची तपोभूमी श्रीक्षेत्र थेऊर, देवी पार्वतीची आराधना क्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, भगवान श्री सूर्य स्थापित श्री हेरंब गणेश श्रीक्षेत्र काशी अशा रुपात पंचेश्वरांनी केलेली गणेशोपासना पाहता येते. […]

श्री गणेश अवतारलीला १० – श्री पंचकन्यापती गणेश

भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात. […]

मोरया माझा – १० : श्री गणेशांच्या दोन बाजूंच्या शक्तींपैकी सिद्धी कोणती? बुद्धी कोणती?

भगवान श्री गणेशांच्या दोन बाजूला दोन शक्ती उभ्या असतात. एकीचे नाव देवी सिद्धी असते. तर दुसरीचे नाव देवी बुद्धी असते. पण यातील नेमकी सिद्धी कोणती? आणि बुद्धी कोणती? बुचकळ्यात पडलात ना? आपण कधी याचा विचारही करीत नाही. पण शास्त्रकारांनी सर्व गोष्टींचा विचारही केला आहे आणि कारणेही दिलेली आहेत. […]

श्रीमुद्गलपुराण – ९

श्री मुदगल पुराणाने वर्णिलेल्या अष्टविनायकांची मूळ स्थाने भारताच्या आठ दिशेला आठ आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव येथे मोरयाच्या मंदिरात आठ दिशांना या आठ विनायकांच्या मूर्ती स्थापित आहेत. भगवान श्रीमयुरेश्वर यांच्या पूजनानंतर पूर्वेकडून अनुक्रमे भगवान श्री वक्रतुंड, श्री एकदंत, श्री महोदर, श्री गजानन, श्री लंबोदर, श्री विकट,श्री विघ्नराज आणि श्री धूम्रवर्ण अशा या आठ विनायकांची पूजन करायचे असते. वेगळ्या शब्दात एकाच मंदिरात संपूर्ण भारताची यात्रा करण्याची सुविधा आहे श्रीक्षेत्र मोरगाव. […]

श्री गणेश अवतारलीला ९ – श्री शूर्पकर्ण अवतार

श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे. […]

1 37 38 39 40 41 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..