बाप बाप म्हणजे काय
बाप बाप म्हणजे काय कसा असतो ठाव नाय ! व्हते मी पाळण्यात जव्हा देवा घरी गेला तो तव्हा ! शेजारला व्हती मैत्रीण चिऊ तिचा बाप आणत व्हता खाऊ ! माला वाटे तिचा हेवा मालाबी बाप हवा ! डोळे माझे पाणावलेले असत माय कड जाय मी पुसत ! तक्रार एकच व्हती माझी , “का नाय माला बी बाप “? कुरवाळुनी माय म्हणे “मीच तुझी माय न मीच तुझा बाप!”