ए.टि.पी. चे फायदे.
भारतीय गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड व आयुर्विमा क्षेत्रातील युलीप हे गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध होऊन बरीच वर्षे होऊन गेली आहेत. छोट्या छोट्या रकमांपासून गुंतवणुक करण्याची सोय, चार वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमधे गुंतवणुक करण्याची सुविधा, चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा व लवचिकता या मुळे म्युच्युअल फंडांच्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रीय झाल्या.
[…]