नवीन लेखन...
ऊपेंद्र चिंचोरे
About ऊपेंद्र चिंचोरे
श्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.
Contact: Facebook

मास्टर दीनानाथ

वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे, || मालक || “माझ्या घरांत मी तुला […]

पानशेत धरण फुटीच्या आधीचे पुणे

आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे  ! पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये […]

गडसम्राट ‘गोनिदां’च्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण

गडसम्राट गोपाळ नीलकंठ दाण्डेकर ह्यांच्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण : वंदनीय आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज ८ जुलै २०१६ सांगता दिन मला लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची, इतिहासाची आवड ! त्याला कारणही तसेच आहे. वंदनीय श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्यावर झाला, त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर गावचा माझा जन्म ! त्यामुळे पूज्य गो. नी. दाण्डेकर ह्यांच्या पुस्तकांची […]

व्यासपूजन

विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर ल. गावडे सरांनी २० जून २०१६ रोजी त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय. वंदनीय गावडे सरांनी वीस जून दोन हजार सोळा रोजी, त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय ! २० जून १९२४ ही सरांची जन्मतारीख आहे. आजच्या मंगलदिनी गावडे सरांच्या घरी, दिवसभर त्यांच्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकगणांचा, पत्रकारांचा, साहित्यिक, शासकीय, कला, अश्या विविध क्षेत्रातील जाणत्यांचा वावर असतो. […]

स्मरणशक्तीचे सर्वोत्तम उदाहरण : माझी आजी

माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय ! माझी आजी म्हणजे माहेरची “द्वारका” ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, […]

सांग पावसा कुठेशी दडला ?

माझी ही गीतरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली आहे तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे दुष्टकाळ रे म्हणती याला, सांग पावसा कुठेशी दडला ?!| ध्रु || तुला गौरविले जीवनदाता, स्वतःच ठरला खोटा आता, कां रे डोळा असा उघडला ? सांग पावसा कुठेशी दडला ? || १ || करीत होता मेघगर्जना, गङगङोनी भिववी जनांना, मुहूर्त टळला, तरीही […]

ये रे ये घना । तोषवी तना

माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे. ये रे ये घना | तोषवी तना | तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु || हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी | पुरे पुरे आता, राख-रांगोळी | सुकल्या माझिया देहावरी, जल शिंपना | ये रे ये घना | ये […]

माकडांची शाळा

माकडांची एकदा, भरली शाळा | मास्तर झाला, चिपांजी काळा || १ || वानर चेले शिकू लागले | धडे सगळे गिरवू लागले || २ || पट पट मारू कोलांटी उडी | नाही तर बसेल, वेताची छडी || ३ || भरभर म्हणू, हूप हूप हूप | शेपटीला लागेल शेरभर तूप || ४ || दास आपण राजा रामाचे | […]

बोला अमृत बोला – ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांच्या सहवासातील आठवणी

मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात ! त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे […]

चांदणे तुझ्या स्मरणाचे

कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे सरांच्या सहवासातील काही संस्मरणीय क्षण मा. कवी ग्रेस, ह्यांची नि माझी पहिली समक्ष भेट झाली, तो दिवस होता १२ ऑगस्ट २००३ ! पुण्यातील प्रभात रोडवरील स्वरूप हॉटेलमध्ये ! “दुपारी साडेतीन वाजता ग्रेस सरांना भेटा”, असा मला मुंबईहून मा. मंगेशकर ह्यांच्या घरून फोन आला ! त्या भेटीचे निमित्त म्हणजे, मा. पंडित हृदयनाथजी […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..