नवीन लेखन...
Avatar
About वर्षा पतके - थोटे
मी लघू कथा,कविता ,ललित ,लेख इत्यादी साहीत्यातील लेखन प्रकार लिहीते.

रानपाखरं

येत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार . […]

गाभारा 

पुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात. […]

पोरकेपण

कधी कधी उतरत्या कठीण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून येत. कधी वाटतं की , मनाची नाजूक कोवळी हळुवार पालवी या धुक्यात कोमेजते की काय ? तरिही सांज होतेच . इवल्याश्या पंखांनी दूर दूर जाणा-या पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून येते. वृदांवनातली सांजवात काळीज तुटत तुटत विझतांना मन वातीसारखंच विझत जातं. प्रसन्न […]

गवाक्ष

जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा. नाहीतर थांबला तो संपला या वाक्याप्रमाणे अनपेक्षित पणे मनातील गवाक्षाने शोधलेलं पदरात पडलेलं चांदणं वेचता आलंच नसतं. […]

रंगछटा

प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही […]

वळीव

आज तू अगदी पहाटेच्या सूर्यकिरणांसोबत आलासच .तिलाही तूझ्या येण्याची चातका सारखी ओढ असतेच अरे…….आणी हे लिखीतच जणू युगानूयुगे चालत आलेले ……पण तरीही हे गुपीत शहाण्यापेक्षा वेड़्यांनाच जास्त उमगलेलं. […]

अशावेळी

अशावेळी मनाचा आनंद जपावा की बूध्दीचा मान ठेवावा. असा अभिमन्यू झालाय का कूणाचा? […]

विश्रब्ध

जे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने जगता आले असते. एकाच जन्मी पूनर्जन्म ……झाड़ासारखा ….. […]

कविते….

तू आता आमच्या सोबत कायमच असतेस… खातांना, पिताना, जगतांना.. इतकंच काय मरतांनाही….. […]

काळजी नसावी

या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल? […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..